आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: झाडे वाचवण्यासाठी रेल्वे परिसरात टाकणार भूमिगत वीज वाहिनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- ताप्ती क्लब, रेल्वे स्थानक, रेल्वे कर्मचारी वसाहत व रेल्वे हद्दीत अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन डेरेदार वृक्ष शहराच्या सौंदर्यात भर घालून उभे आहेत. मात्र, रहिवासी एरिया व कार्यालयीन भागात असलेल्या या हिरव्यागार झाडांची अनेकवेळा वीज तारांमुळे छाटणी करावी लागते. त्यामुळे डेरेदार झाडे बोडखी होतात. हा प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ताप्ती क्लबमध्ये सहा किलोमीटर अंतराची भूमीगत वीज वाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरात हे काम सुरू होणार आहे. 


रेल्वेच्या परिसरात मोठमोठी झाडे आहेत. पावसाळ्यात या झाडांना वीज तारांचा स्पर्श होऊन वीजपुरवठा खंडीत हाेतो. हे प्रकार टाळण्यासाठी नाईलाजाने झाडांची छाटणी करावी लागते. त्यात डेरेदार वृक्ष बोडखी होतात. हा प्रकार टाळण्यासाठी डीअारएम अार. के. यादव यांनी इलेक्ट्रिक विभागाचे वरिष्ठ मंडळ अभियंता एन. के.अग्रवाल, सहायक मंडळ अभियंता एस. एस. भगत व सहकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात रेल्वे हद्दीत भूमिगत वीज वाहिनी टाकण्यावर एकमत झाले. पहिल्या टप्प्यात ताप्ती क्लबमधील कामाला आठवडाभरात सुरुवात होईल. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी सूचना डीआरएम यादव यांनी केली. वृक्षसंवर्धन व सुरळीत वीजपुरवठा असा दुहेरी हेतू साध्य करण्यासाठी हे काम हाती घेण्यात येईल. वृक्षांचे जतन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या उपक्रमाचे शहरातील पर्यावरणप्रेमींकडून स्वागत केले जात आहे. 


रेल्वे स्थानक परिसर 
रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण सुरू आहे. पुढील टप्प्यात स्थानक परिसरात भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात येईल. या पाठोपाठ रेल्वे कर्मचारी वसाहत असलेल्या १५ बंगला, ४० बंगला, गार्ड लाईन येथेही भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात येईल. यामुळे वादळ, वाऱ्याने वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार व अपघातांची शक्यता टळेल. 


पावसाळ्यात फांद्यांचा अडथळा 
रेल्वे परिसरात हिरव्यागार झाडांचे आच्छादन अाहे. मात्र, पावसाळ्यात झाडाच्या फांद्या वीज वाहिन्यांना अडथळा ठरतात. अनेकवेळा वीजपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे नाईलाजाने झाडाची छाटणी करावी लागते. भविष्यात असे प्रसंग येऊ नये यासाठी भूमिगत वीज वाहिनी टाकणार आहे. 
- अार. के. यादव, डीअारएम, भुसावळ 

बातम्या आणखी आहेत...