आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांत आटोपून घ्या बँकेची विविध कामे; शनिवारपासून 1 मे पर्यंत सलग चार दिवस सुट्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या महिन्याप्रमाणे या महिनाअखेरीसही शेवटचे तीन दिवस व मे महिन्याचा पहिला दिवस असे चार दिवस शासकीय सुट्टी अाहे. त्यामुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार अाहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसा आपली बँकिंगची कामे आटोपून घ्यावी लागणार आहेत. 


एप्रिल महिन्यातील येणाऱ्या २८ तारखेला चाैथा शनिवार अाहे. त्यामुळे बॅँकांना सुट्टी असेल. त्यापाठोपाठ रविवार आणि साेमवारी बुध्द पाैर्णिमेची शासकीय सुट्टी अाली अाहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचे शेवटचे तीन दिवस बँका बंद असतील. तर मे महिन्याचा पहिला दिवस १ मे राेजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सुट्टी असणार अाहे. बँकांना या सलग सुट्ट्यांमुळे नागरिकांनी बँकींग कामासाठी बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसातच काम अाटाेपून घ्यावी लागणार अाहेत. सलग सुट्ट्यांमुळे एटीएममधील कॅश संपून नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी बँकांकडून विशेष सूचना देण्यात अाल्या अाहेत. 


एटीएमच्या क्षमतेत वाढ 
सलग सुट्ट्यांमुळे ग्राहकांना कॅशचा तुटवडा भासू नये यासाठी एटीएममधील कॅशची क्षमता वाढविण्याच्या सूचना देण्यात अाल्या अाहेत. 
- गीतेश मेश्राम, उपव्यवस्थापक, सेंट्रल बंॅक 

बातम्या आणखी आहेत...