आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेषण अाहाराच्या निविदेची शालेय शिक्षणमंत्र्यांनी मागवली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शालेय पाेषण अाहार याेजनेत बाजारभावापेक्षा अधिक दराने काढण्यात अालेल्या निविदेसंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राज्यातील सर्व निविदांची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी मागवली अाहे. यासंदर्भात सचिवांशी बाेलणार असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. 


शालेय पाेषण अाहार याेजनेत सहा महिने निविदा रेंगाळल्यानंतर अखेर ३० नाेव्हेंबर राेजी निविदेला मंजुरी देण्यात अाली अाहे. या निविदेत संबंधित पुरवठादाराला डाळी अाणि कडधान्याचे दर हे बाजारभावापेक्षा दुपटीने मंजूर करण्यात अाले अाहेत. ५५ रुपये किलाे दराने मिळणाऱ्या मूगडाळीला ९१ रुपये शासकीय भाव देण्यात अालेला अाहे. या याेजनेत विद्यार्थ्यांचे नव्हे तर ठेकेदारांचे पाेषण हाेत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले हाेते. या प्रकरणात शालेय शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निविदा प्रक्रिया, त्यात मंजूर करण्यात अालेले दर यासंदर्भात सचिवांशी चर्चा करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे म्हटले अाहे. 


राज्यभराची माहिती मागवली 
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या दराच्या निविदा मंजूर करण्यात अालेल्या अाहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाकडून सर्व माहिती मागवली अाहे. जास्त दराच्या निविदेची कारणे शाेधून पुन्हा निविदा काढण्यासंदर्भात मंत्र्यांशी बाेलू. 
- राधाकृष्ण विखे-पाटील, विराेधी पक्षनेते, विधानसभा. 

बातम्या आणखी आहेत...