आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमध्ये पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी बुस्टर पंपाची दोन दिवसांनी पुन्हा चाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील प्रभाग नऊ आणि 19 मधील विस्तारीत भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत तर या संदर्भात बुस्टर पंपाद्वारे चाचणी घेण्यात आली असली तरी ते तांत्रिक अडचणीमुळे असफल ठरली. दोन दिवसांनी पुन्हा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

प्रभाग क्रमांक नऊ आणि 19 मधील दत्तनगर, श्रीराम नगर, बोंडे कटर, चमेली नगर, चक्रधर नगर आदी भागांतील रहिवाशांना गत दशकापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी 12.5 अश्वशक्ती क्षमतेचा बुस्टर बसवला असून त्याची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. किरकोळ तांत्रिक कारणाने चाचणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. येत्या दोन दिवसांत चाचणी पूर्ण करून या भागातील नागरीकांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जामनेर रोडवरील मेन रायझींग पाईप लाईनवरुन 12.5 अश्वशक्तीच्या पंपाव्दारे पाणीपुरवठा उच्चदाबाने होणार आहे. यामुळे आगामी उन्हाळ्यात या भागातील तब्बल पाच ते सात हजार नागरिकांना दिलासा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...