आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पाणीपुरवठा १ दिवस पुढे ढकलला; मनपातर्फे पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पावसाळा ताेंडावर अाला असून पालिकेने विद्युत पंप, जलवाहिनी तसेच झाडांची कटिंग करण्याचे काम हाती घेतले अाहे. शुक्रवारी दिवसभर कामे केली जाणार असल्याने पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला अाहे. ३० तासांचा कालावधी लागणार असल्याने १८ राेजीचा पाणीपुरवठा १९ मे राेजी केला जाणार अाहे. 


महापालिकेला दरवर्षी पावसाळ्यापूर्वी काही कामे उरकून घ्यावी लागतात. पावसाळ्यात वादळामुळे अडचणी अाल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेत असताे. त्यामुळे पालिकेने वाघूर राॅ वाॅटर पंपिंग येथील ५०० एचपी पंप दुरुस्ती करण्यात येणार अाहे. तसेच विद्युत वाहिनीवरील झाडांची कटिंग करणे गरजेचे झाले अाहे. याशिवाय गिरणा टाकी चर्चजवळ वाघूर पाणीपुरवठा याेजनेंतर्गत टाकण्यात अालेली १२०० मिमी पाइपलाइन दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेतले जाणार अाहे. 


उद्या येथे पुरवठा : वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकरनगर, अासाेदा राेड, मेहरूण परिसर, सप्तश्रृंगी काॅलनी, महाजननगर, एकनाथनगर, मंगळपुरी, दत्तनगर, माेहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, खाेटेनगर, दांडेकरनगर, मानराज पार्क, अासावानगर, निसर्ग काॅलनी, शिवाजीनगर हुडकाे, प्रजापतनगर, एसएमअायटी परिसर, तांबापुरा, वाघनगर, शिव कॉलनी, विद्युत काॅलनी, विवेकानंदनगर, गणपतीनगर, अादर्शनगर. 


अाज ये‌थे पुरवठा 
शुक्रवारी जुना खेडीराेड परिसरातील खेडीगाव, शंकररावनगर, ज्ञानदेवनगर, तळेले काॅलनी, याेगेश्वरनगर, सदाेबानगर, अयाेध्यानगर, मेहरूण परिसर अादी परिसरातील पाणीपुरवठा नियमित वेळेत केला जाणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...