आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी दुरुस्त; अाज पाणी येणार; काम पूर्ण झाल्याने रात्रीतून टाक्यांमध्ये भरले पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या तीन दिवसापासून खंडित शहरातील पाणीपुरवठा रविवारपासून सुरळीत हाेणार अाहे. १ हजार मीमीच्या जलवाहिनीवरील दुरुस्तीचे काम शनिवारी रात्री पूर्ण झाल्याने रात्रीतून टाक्यांमध्ये पाणी भरण्यात येेऊन पहाटेपासून पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे पाणी पुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी सांगितले. 


गिरणा टाकीजवळील १००० मीमीच्या जलवाहिनी दुरूस्तीचे काम शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरू हाेऊ शकले नव्हते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पुन्हा एक दिवस पुढे ढकलण्यात अाला हाेता. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच पाणीपुरवठा विभागाचे अभियंते व कामगार याठिकाणी तळ ठाेकून हाेते. रात्री ९ वाजेच्या सुमारास या जलवाहिनीवरील वेल्डिंगचे काम पूर्ण झाले. त्यानंतर अर्धातास टेस्टिंग करण्यात अाली. 


अाज या भागात हाेईल पुरवठा 
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, अासाेदा राेड, माेहननगर, नेहरूनगर परिसर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकरनगर, मानराज पार्क, अासावानगर, निसर्ग काॅलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पाेलिस काॅलनी परिसर, खाेटेनगर, शिवाजीनगर हुडकाे, प्रजापतनगर, एसएमअायटी परिसर, याेगेश्वरनगर, हिरा पाइप, शंकररावनगर, खेडीगाव परिसर, तांबापुरा, शामाफायर समाेरील परिसर, वाघनगर, शिव काॅलनी, विद्युत काॅलनी, राका पार्क, पाेस्टल काॅलनी, विवेकानंदनगर, गणपतीनगर, अादर्शनगर या भागात पाणीपुरवठा हाेणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...