आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती घरात एकटी झोपली असताना आरोपीने केले असे काही; कोर्टाने सुनावली ही शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- एका 21 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला दोन वर्ष सक्तमजुरी तर इतर दोन कलमान्वये प्रत्येकी एक वर्ष अशी तब्बल चार वर्षे सक्तमजुरी आणि तीन कलमान्वये 5 हजारांचा दंड ठोठावला आहे. आरोपीचे नाव महेंद्र गोरख चौधरी (रा. थरेगव्हाण, ता. यावल) असे आहे. हा निकाल मंगळवारी (दि.13) यावल न्यायालयाने दिला. हा गुन्हा 9 व 12 नोव्हेंबर 2016 रोजी घडला होता.

 


विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 9 नोव्हेंबर 2016 रोजी तिचे पती व कुटूंबीय शेतात कापूस वेचणी करीता गेले होते व ती घरात एकटी असताना महेंद्र गोरख चौधरी हा त्यांच्या घरात दाखल झाला. विवाहिता झोपलेली असताना तिच्यासोबत अंगलटपणा केला. महिलेला जाग आली व तिने आरडाआरडा केला. तेव्हा आरोपीने घरातुन पळ काढला. घडलेला प्रकार तिने पती व कुटुंबातील लोकांना सांगितला. मात्र, आपली बदनामी होईल म्हणुन ते गप्प राहिले. आरोपी 12 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी महिलेचे पती व कुटुंबीय शेतात कामाला निघुन गेल्यावर घराबाहेर भांडी घासत असताना तिला म्हणाला की, त्या दिवशी तु माझ्या हातातुन सुटली, आता तुला सोडणार नाही. महिलेने आरडा ओरड केल्यावर तो पुन्हा पळाला. विवाहितेने कुटुंबातील लोकांना हा प्रकार सांगितला व थेट यावल पोलिस ठाणे गाठले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरिक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रा.का.पाटील यांनी केला व न्यायालयात संबधिताविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. तेव्हा येथील प्रथमवर्ग न्यायधीश डी. जी. जगताप यांच्या समोर सरकारी वकील अॅड. जी. एम. बागुल व अॅड. फरीद शेख यांनी फिर्यादी, तपासी अंमलदारासह एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यात आरोपी दोषी आढळला. तेव्हा न्यायालयात  अधिकारी म्हणुन प्रमोद लोणे, आलीम शेख यांनी काम पाहिले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...