आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलम फळ्या काढताना दुसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू, भजे गल्लीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काॅलमच्या फळ्या काढताना वरून पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी सकाळी ११ वाजता भजे गल्ली परिसरात घडली. संजय तायडे असे मृत मजुराचे नाव आहे. दुपारी शवविच्छेदन करून मृतहेद कुटुंबियांच्या ताब्यात दिला. या वेळी कुटुंबियांनी माेठा आक्रोश केला.

 

भजे गल्ली परिसरात उदय वाघ यांच्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. संजय तांबट यांना बांधकामाचा मक्ता दिला आहे. त्यांच्या हाताखाली मजुर काम करतात. गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मजूर संजय मंगा तायडे (वय ४५, रा. पिंप्राळा) दुसऱ्या मजल्यावर कॉलमच्या फळ्या काढण्याचे काम करत असताना त्यांना चक्कर आली. त्यात तोल जाऊन ते दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार ठेकेदार व इतर मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ तायडे यांना जिल्हा रूग्णालयात आणले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन तायडे यांना मृत घोषित केले. पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांची पत्नी ज्योती तसेच लहान मुलगा रोहित याने रूग्णालयात हंबरडा फोडला. तायडे हे घरातील कर्ते पुरूष होते. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...