आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल (जळगाव)- गेल्या नोव्हेंबर महिन्यात अंजाळे घाटात सराफ व्यावसायिकास मारहाण करून सोन्या चांदीचे एकुण 5 लाख 91 हजारांची लुट झाली होती. या प्रकरणी तीन संशयितांना यावल पोलिसांनी अटक केली आहे. हेे तिघे भुसावळ येथील असून शुक्रवारी तिघांना अटक करण्यात आली. त्यांना 4 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी कोठडी संपल्यावर तिघांना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित हे 18 ते 19 वयोगटातील असुन यापुर्वी त्यांनी फैजपूर रस्त्यावर अशाच प्रकारे दुचाकीस्वारास लुटलेे होते.
शहरातील मेनरोडवर सराफ व्यावसायिक रमेश सदाशिव जाधव हे 11 नोव्हेंबर 2017 रोजी जळगावहून सोने व चांदीचे दागिने घेवुन यावलकडे येत होते. दरम्यान अंजाळे (ता. यावल) येथील घाटात त्यांच्यावर रात्री नऊच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेेल्या सहा अज्ञात दरोेडेेखोरांनी हल्ला केला व यांच्याकडे एका बॅगेत असलेले 186. 5 ग्रॅम सोन्याचे दागिने व बिस्कीट आणि 112 ग्रॅम चांदीचे दागिने असा 5 लाख 91 हजार 500 रूपयाचा एेवज त्यांनी लांबवला होता. त्यात दरोडेखोरांनी जाधव यांना जबर मारहाण केली होती. या प्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीनुसार यावल पोलिसात अज्ञाताविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा या गुन्ह्यातील संशयित म्हणुन रेहान हूसेन पटेल (वय 19, रा. केंद्रीय विद्यालयाजवळ, भुसावळ) शेख मोहसिन शेख सलीम (वय 19) व शहजाद सईद अहमद (वय 18 दोघे राहणार आगवाली चाळ, भुसावळ) या तिघांना यावल पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांना मंगळवारपर्यंत चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती तर मंगळवारी पुन्हा यावल न्यायालयात हजर केले असता तिघांना 15 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोलिस निरिक्षक डी.के. परदेशी, हवालदार संजय तायडे, सतीश भोई, भुषण चव्हाण, गनी मिर्झा करीत आहेत.
गुन्ह्यातील साम्य पाहता संशय
या तिघा संशयितांनी न्हावी (ता. यावल) येथील एका दुचाकीस्वारास भुसावळ-फैजपूर रस्त्यावर अडवून मोबाईल व रोख रक्कम लुटली होती. मोबाईलमुळे तिघे पोलिसांच्या जाळ्यात सापडले होते. या प्रकरणी तिघांना फैजपूर पोलिसांनी अटक केली होती तेव्हा ती घटना आणि अंजाळे घाटातील दरोडा यात साम्य असल्याने त्यांच्यावर संशय आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.