आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YAVAL : वीस मिनीटे प्रखर झुंज देऊन 23 वर्षीय तरुणाने बिबट्याला केले ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिबट्याशी झुंज देणारा बहाद्दर तरुण समीर तडवी रुग्णालयात आपल्या जखमा दाखवताना - Divya Marathi
बिबट्याशी झुंज देणारा बहाद्दर तरुण समीर तडवी रुग्णालयात आपल्या जखमा दाखवताना

यावल - शेतात नांगरणी करताना बिबट्याने हल्ला चढवताच एका बहाद्दर तरुणाने तब्बल २० मिनीटे झुंज देऊन बिबट्याला ठार मारल्याची घटना रविवारी सकाळी यावलमध्ये घडली.   दगडांचा मारा करीत प्रतिहल्ला चढवून तरुणाने बिबट्याला मारले.  सातपुडा जंगलाच्या शेजारीच लागून असलेल्या शेतात बिबट्याने हा हल्ला चढवला होता.विशेष म्हणजे बिबट्याला ठार मारल्यानंतर जखमी अवस्थेतच पायी चालत हा तरुण न्हावी  गावात पोहोचला होता. 


समीर युसूफ तडवी असे या तरुणाचे नाव असून तो  तिड्या गावचा (ता.रावेर)  रहिवासी अाहे.रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तो   यावल प्रादेशिक पूर्व वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४४ मधील आपल्या शेतात नांगरणी करत होता. शेताच्या बांधावर झाडाखाली त्याने पिण्यासाठी भांड्यात पाणी ठेवले होते. कामादरम्यान तो पाणी पिण्यासाठी गेला. त्याचवेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. समीरने स्वत:च्या बचावासाठी बिबट्यावर दगडाने हल्ला चढवला. त्यात बिबट्या ठार झाला. जखमी अवस्थेत समीर पायी चालत न्हावी (ता.यावल) येथे पोहोचला. त्याने घडलेली माहिती वन कर्मचाऱ्यांना दिली. त्याच्यावर न्हावी ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा समान्य रूग्णालयात हलवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...