आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपत प्रवेशासाठी १० मातब्बर नगरसेवक रांगेत उभे; जलसपंदामंत्री गिरीश महाजन यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप युतीचा निर्णय रात्रीपर्यत झालेला नाही. अामची बोलणी सुरु आहे. मात्र, समोरील पक्षाकडूनही तशी पावले उचलली जात नसल्याची स्थिती आहे. अर्थात, युतीबाबत अद्याप ठाेस काहीही सांगता येणार नाही. आमच्याकडे येणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत आहे. अभ्यास करुन मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यत अंतीम निर्णय घेवून उमेदवारांची यादी जाहीर करु. भाजपत प्रवेशासाठी १० मातब्बर नगरसेवक रांगेत उभे अाहेत, अशी माहिती जलसपंदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली. 


महापालिकेच्या १ ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना पुरस्कृत खानदेश विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दोन दिवसांपासून खलबते सुरु आहेत. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक अाहे. अद्याप कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने उमेदवारांची निश्चिती केली नसल्याची स्थिती आहे. यामुळे सर्वाचेच लक्ष युतीच्या निर्णयाकडे लागले आहे. दरम्यान, साेमवारी सायंकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या शिवतीर्थ मैदानासमोरील संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.


ललित कोल्हेंसह १३ नगरसेवकांचे राजीनामे 
महापौर ललित कोल्हे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी सोमवारी तातडीने आपल्या नगरसेवकपदाचा आयुक्तांकडे राजीनामा सादर केला. काेल्हे यांच्यासह मनसे, राष्ट्रवादी व खाविआच्या मिळून १३ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये मनसेचे विजय कोल्हे, सिंधू कोल्हे, खुशबू बनसोडे, पद्माबाई सोनवणे, कांचन सोनवणे, संतोष पाटील, राष्ट्रवादीचे सुरेश सोनवणे, गायत्री शिंदे, प्रतिभा कापसे, शोभा बारी, खाविआचे दत्तात्रय कोळी व भारती सोनवणे यांचा समावेश आहे. 


रिपाइंला २ जागा 
महापालिका निवडणुकीत भाजप रिपाईला दोन जागा देणार आहे. यासंबंधी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी रात्री जलसंपदामंत्री गिरीश महाजन याच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या वेळी महाजन यांनी एक जनरल व एक अनुसूचित गटातील जागा देण्याचे आश्वासन आठवले यांना दिले. त्यानुसार प्रभाग क्रमांक १३ मध्ये बेबाबाई बळीराम सपकाळे आणि प्रभाग क्रमांक १९ मधून विमल सुरेश अडकमोल यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती रिपाइं महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...