आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणुकीसाठी ७५ उमेदवारांचे १०६ अर्ज दाखल; अाज दुपारी ३ वाजेपर्यंतच मुदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शेवटचे दाेन दिवस शिल्लक असताना खऱ्या अर्थाने रंगत अाली. मंगळवारी ७५ उमेदवारांनी तब्बल १०६ अर्ज दाखल केले. यात २४ जणांचे दाेनपेक्षा जास्त अर्ज दाखल हाेते. विशेष म्हणजे १४ विद्यमान नगरसेवकांचा यात समावेश अाहे. अर्ज दाखल करण्याची बुधवारी शेवटची मुदत असल्याने पालिकेत गर्दी हाेण्याची शक्यता अाहे. उमेदवारांना दुपारी ३ वाजेपूर्वी हजर राहावे लागणार अाहे. 


महापालिका निवडणुकीची घाेषणा हाेऊनही प्रशासकीय घडामाेडी व्यतिरिक्त उमेदवारांकडून गेल्या सहा दिवसांत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण तयार हाेत नसल्याचे बाेलले जात हाेते. परंतु, नामनिर्देशनसाठी शेवटचे दाेन दिवस असल्याने मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून उमेदवार व समर्थकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली हाेती. एेन दुपारी पावसाचा शिडकावा सुरू असला तरी कार्यकर्त्यांची झालेली धावपळ मात्र थांबलेली नव्हती.


१४ नगरसेवकांनी दाखल केले अर्ज 
मंगळवारी सुमारे ७५ जणांनी १०६ अर्ज दाखल केले अाहेत. यात पक्षाच्या चिन्हावर तर दुसरा अर्ज अपक्ष अाहे. काही नगरसेवकांनी सेटलमेंटच्या हिशाेबाने दाेन ठिकाणी अर्ज दाखल केल्याचे स्पष्ट दिसत अाहेत. ७५ पैकी २४ जणांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केला अाहे. विद्यमान १४ नगरसेवकांनी अर्ज दाखल केले. यात भाजपचे १० तर शिवसेनेच्या ४ नगरसेवकांचा समावेश अाहे. 


अफवांना 'ब्रेक' 
ललित काेल्हे यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर खाविअाचे गटनेते सुनील महाजन यांच्याही पक्षांतराची चर्चा सुरू हाेती. दाेन दिवस खाविअाच्या नगरसेवकांच्या नावाच्या अफवा हाेत्या. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी सुनील महाजन व जयश्री महाजन यांनी दुपारी १ वाजता सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला अाहे. 


५ नगरसेवकांचे राजीनामे, पक्षांतर 
पक्षांतरामुळे अडचणी नकाेत, या हेतूने नगरसेवकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली अाहे. अातापर्यंत १८ नगरसेवकांनी राजीनामे दिले असून मंगळवारी ५ जणांनी प्रशासकीय अडचणीतून सुटका करून घेतली. महापालिका अायुक्त चंद्रकांत डांगे यांच्या दालनात येत नगरसेवकांनी राजीनामे सादर केले. यात खाविअाचे नगरसेवक सदाशिव ढेकळे, राष्ट्रवादी नगरसेविका शालिनी काळे, मनसे नगरसेविका व नुकताच राष्ट्रवादी तंबूत दाखल झालेल्या पार्वता भील, अपक्ष नगरसेवक नवनाथ दारकुंडे, मनसेचे स्वीकृत नगरसेवक अनंत जाेशी, मनसेच्या नगरसेविका लिना नवीन पवार यांनीही राजीनामा दिला. पवार व जाेशी यांनी शिवसेनेचा मार्ग निवडला तर अन्य राजीनामा दिलेल्या नगरसेवकांनी भाजपकडून उमेदवारी मिळवली. 
उमेदवारांची पळवापळवी टाळण्यासाठी बाळगताहेत सावधगिरी 


शिवसेना-भाजप स्वबळावर लढणार 
महापालिका निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले युतीचे गुऱ्हाड सुरूच अाहे. मात्र, दुसरीकडे भाजप व शिवसेनेने संपूर्ण जागा लढण्याची तयारी केली अाहे. उमेदवार पळवापळवीच्या पार्श्वभूमीवर यादी जाहीर न करण्याची सतर्कता बाळगण्यात अाली अाहे. दरम्यान तिकिटावर शिक्कामाेर्तब झालेल्या उमेदवारांना मंगळवारी नामनिर्देशन दाखल करण्याचे अादेश दिले. त्यामुळे शिवसेना व भाजप स्वबळावर लढणे निश्चित झाले असून युतीची चर्चा फिस्कटल्याची अाैपचारीक घाेषणा हाेणे अाता बाकी अाहे. 


तर मैत्रीपूर्ण लढत हाेईल 
शिवसेनेसाेबत युतीची चर्चा ही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासाेबत हाेत अाहे. माझ्यापर्यंत प्रस्ताव अथवा निराेप नाही. युती करायची असल्यास सन्मानपूर्वक जागा हव्या अाहेत. युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. वर्षभरापासून फिफ्टी प्लस मिशन सुरू अाहे. यासाठी कार्यकर्ते कामाला लागले अाहेत अाणि अाजही काम सुरू अाहे. वर्षभरापासून ७५ जागा लढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना कामाच्या सूचना दिल्या अाहेत. शिवसेनेसाेबत युती न झाल्यास दाेन्ही मित्रपक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती हाेतील. त्यानंतर जे काही व्हायचे ते हाेईल. भाजपकडे ताेलामाेलाचे उमेदवार अाहेत.
- अामदार सुरेश भाेळे, अामदार तथा महानगर अध्यक्ष, भाजप 


अाता जे काही हाेईल ते मैदानातच 
शिवसेनेने ७५ उमेदवारांची यादी तयार केली अाहे. खाविअा प्रगतीत अडसर ठरतेय, असे मनात येऊ नये म्हणून अाम्ही युतीसाठी सकारात्मक प्रस्ताव दिला हाेता. कामे मार्गी लावण्यासाठी समन्वयाचा मार्ग निवडला हाेता. सध्या जे घडत अाहे ते अामच्या तत्वाच्या विराेधात अाहे. अामच्या परिवारावर जाे विश्वास दाखवला त्या बळावर मतदार न्याय करेल. विकासासाठी अामचे निर्णय अाम्हीच घेताे, अाम्हाला परवानगी घ्यावी लागत नाही. निर्मळ मनाने युतीचा प्रस्ताव ठेवला हाेता. त्याला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळत अाहे, ते पाहून अापण कुठे जाताेय? असेच वाटते. त्यामुळे अाता जे काही हाेईल ते मैदानातच. 
- रमेश जैन, अध्यक्ष, खान्देश विकास अाघाडी 

बातम्या आणखी आहेत...