आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरिश पटेल, कदमबांडेच्या निवासस्थानी दुसऱ्या दिवशीही 15 तास आयकर तपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- आयकर विभागाच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशीही माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व अमरिश पटेल यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी सुमारे १५ तास तपासणी झाली. तपासणीनंतर काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रिंट काढण्यासाठी माजी अामदार राजवर्धन कदमबांडे यांच्या निवासस्थानी लॅपटॉप व प्रिंटर मागविण्यात आले. एका महत्त्वाच्या बैठकीसाठी कदमबांडे यांना बाहेर जाण्यासाठी मुभा देण्यात आली. त्यांच्यासोबत एका अधिकाऱ्याला पाठवण्यात आले होते. तपासणीसाठी आमदार अमरिश पटेल, राजवर्धन कदमबांडे व इतरही पूर्ण सहकार्य करत असल्याची माहिती या विभागातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.   दरम्यान, एका अत्यावश्यक बैठकीचे कारण सांगितल्यानंतर आयकर विभागाने माजी आमदार कदमबांडे यांना घराबाहेर जाण्यास मुभा दिली. दरम्यान, कदमबांडे यांच्या निवासस्थानी असलेले दोन शिपाई, पुजारी  व घरकाम करणाऱ्या काही महिलांनाही बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...