आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजातील 17 जाेडपी फक्त 1 रुपयात विवाहबद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मराठा उद्योजक विकास मंडळ व अखिल भारतीय क्षत्रिय मराठा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक रुपयात आदर्श शुभ मंगल विवाह सोहळ्याचे रविवारी सागर पार्क येथे आयोजन करण्यात अाले होते. या सोहळ्यात १७ जाेडप्यांचे केवळ १ रुपयात विवाह लागले. 


या वेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन , आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, स्थायी समिती सभापती ज्योती इंगळे, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, अखिल भारतीय क्षत्रिय मराठा महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव गुंजाळ, मराठा उद्योजक विकास मंडळाचे अध्यक्ष आनंदराव मराठे, सचिव विष्णू बाळदे, उपाध्यक्ष शालिक मते, उद्योजक कैलास मराठे, अर्जुनराव गायके, भास्करराव जाधव आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक आनंदराव मराठे यांनी केले. तर आजच्या धकाधकीच्या काळात सर्वांकडेच पुरेसा वेळ नाही. अशा काळात सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज बनली असून यामुळे समाजाच्या वेळेची व पैशाचीही बचत होण्यास मदत होते, असे मत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी १५ जणांना समाजभूषण पुरस्कार, १५ मातांना आदर्श माता पुरस्कार व उत्कृष्ठ समाज मंडळ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे भाषण झाले. दुपारी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही सोहळ्यास्थळी भेट देऊन वधू-वरांना आशीर्वाद दिले. या सोहळ्यास्थळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने ५२ बाटल्यांचे रक्तसंकलन करण्यात आले. प्रा. साहेबराव थोरात, विठ्ठलराव मराठे यांनी सूत्रसंचालन केले. पूजा थोरात यांनी आभार मानले. या वेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह अल्प बचतचे निवृत्त सहायक संचालक अर्जुनराव जगताप, रेड स्वस्तिकचे जिल्हाध्यक्ष व मंडळाचे सदस्य डॉ. धनंजय बेंद्रे, शिवाजी ब्रिगेडचे अशोक शिंदे, डॉ. पी. डी. जगताप, भटू वाघारे, सुधाकर बेंद्रे, निवृत्त पोलिस उप अधीक्षक शशिकांत धांडे, अॅड. राजेश झाल्टे, अॅड. राजेश पावसे, विक्रीकर उपायुक्त राजेश जाधव, अशोक बेंद्रे, दादाजी जगताप, किरण काळे, धुळे येथील भटु वाघारे, ज्येष्ठ पत्रकार निंबा मराठे, महेश गायकवाड, शिवसेनेचे अतुल सोनवणे, दिनेश काळे, बबलू सोनवणे, नंदूरबारचे विठ्ठलराव मराठे, तळोद्याचे नवनीत शिंदे, दोंडाईचा येथील दिलीप जाधव, सुरतचे मनोज पवार, जळगाव येथील क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष तथा े संयोजक संजय जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब मते, संभाजी चव्हाण, आनंदराव चौथे, बाळासाहेब मोझे, विष्णू बाळदे, पंडितराव जाधव, अर्जुन जगताप, प्रा. पी. डी. जगताप, विनायक मांडोळे, चाळीसगांवचे उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, शालिग्राम मते आदी उपस्थित होते. 


समाजाचे ऋण फेडण्याचे उत्तम कार्य 
आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजाचे ऋण फेडण्याचे हे उत्तम कार्य असून यासाठी मंडळास आपले सदैव सहकार्य राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी त्यांनी ५१ हजार रुपये देणगी जाहीर केली. समाजातील दात्यांनी विविध वस्तू, रोख रक्कम भेट देण्यासह वेगवेगळ्या व्यवस्था केल्या. यात कपाट, भांडी, मोबाइल, चांदीचे अलंकार, शिवराज्याभिषेक प्रतिमा यासह विविध वस्तू भेट दिल्या. या विवाह सोहळ्यात वरांची घोड्यावरून वाजतगाजत सामूहिक वरात काढण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...