आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुंद महामार्गामुळे पुन्हा दाेन अपघात; तिघे गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात उभा असलेला हाच ताे ट्रक. जखमी वसीम शेख व सैयद जुनेद. - Divya Marathi
जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात उभा असलेला हाच ताे ट्रक. जखमी वसीम शेख व सैयद जुनेद.
जळगाव - अरुंद महामार्गामुळे साेमवारी पुन्हा दाेन अपघात झाले. यात तिघे गंभीर जखमी झालेे अाहेत. मानराज पार्कजवळ सकाळी १० वाजता वाळूच्या भरलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रक जागीच उभा राहिल्याने पाठीमागून येणारी दुचाकी ट्रकवर अादळली. त्यामुळे दुचाकीस्वार व त्याचा मित्र गंभीर जखमी झाले अाहे. पाळधी बायपासजवळ दुपारी ११ वाजता वळण घेत असताना समोरुन आलेल्या चारचाकीवर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला अाहे. वसीम शेख सलीम, सैयद जुनेद सैयद गुलामनबी व भगवान चौधरी असे जखमी झाले असूून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले अाहे.

 

वसीम शेख सलीम (रा.शाहुनगर, वय २१) व सैयद जुनेद सैयद गुलामनबी (वय २४, रा.सिटी कॉलनी, गेंदालाल मिल) हे दोघे घर रंगवण्याचे काम करतात. गुजराल पेट्रोलपंप परिसरातील एका घराला रंग देण्याचे काम त्यांनी घेतले आहे. यासाठी ते सोमवारी सकाळी १० वाजता ते गुजराल पेट्रोल पंपाकडे दुचाकीने (क्रमांक एमएच-०३, बीडी, २०२२) जात हाेते. मानराज पार्कजवळ एका ट्रकने (क्रमांक एमएच-३४, ए, ६८७१) अचानक ब्रेक दाबल्याने ट्रक जागीच उभा राहिला. त्यामुळे मागून येणारी दुचाकी थेट ट्रकवर जावून अादळली. यात दुचाकी चालवणाऱ्या वसीमच्या दोन्ही तर जुनेदच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तेथे उपचार करण्यास असमर्थता दाखवल्यामुळे वसीम याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जुनेदच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे जुनेदला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. जुनेद व वसीम दोघे होतकरू असल्याने समाजातील अनेक लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आल्याने रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रकचालक पोलिस ठाण्यात हजर झाला होता.


ट्रकमध्ये किराणा माल असल्याची जिल्हापेठ पाेलिसांकडून खाेटी माहिती
जुनेद व वसीम यांच्या दुचाकी ज्या ट्रकवर आदळली त्यात प्रमाणापेक्षा जास्त वाळू भरलेली हाेती. अपघातानंतर हा ट्रक जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणण्यात अाला. त्या वेळी ट्रकच्या ताडपत्रीमधून आतमध्ये वाळू असल्याचे दिसत हाेते. अवैध वाळू वाहतुकीमुळे अडचण निर्माण होऊ नये म्हणून चालकाने ट्रक पोलिस ठाण्यातून बाहेर नेला. त्यानंतर काही वेळानंतर ताडपत्रीने वाळू झाकून ट्रक पुन्हा पोलिस ठाण्यात अाणला. ही वाळू झाकण्यासाठी जिल्हापेठ पोलिसांनीच ट्रकचालकास मदत केल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करता, ट्रकमध्ये किराणा माल असल्याची खोटी माहिती खुद्द जिल्हापेठ पोलिसांनी माध्यमांच्या छायाचित्रकारांना दिल्याने सर्वत्र अाश्चर्य व्यक्त करण्यात अाले.

 

बातम्या आणखी आहेत...