आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jalgaon- धानोरात वादळी पावसाने 200 हेक्टरवरील केळी जमीनदोस्त, कोट्यावधींचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धानोरा- चोपडा तालुक्यातील धानोरा, देवगाव, मोहरद, बिडगाव, पारगाव मितावली पिंप्री परिसरात वादळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. यात काढणीवर आलेली 200 हेक्टरवरील केळीचे पिक जमीनदोस्त झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी आमदार चंद्रकांत सोनवणे,निवासी नायब तहसिलदार रावसाहेब पेंढारकर,कृषीअधिकारी डी बी साळुंखे यांनी पाहणी केली. उद्या (8 जून) पासून पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

   

 बुधवारी सायंकाळी वादळी पावसाचा तडाखा धानोरा परीसराला बसलेला आहे. यात नवती, कांदेबाग, काढणीवर आलेली केळी पूर्णपण  जमिनदोस्त झाल्या आहेत. तसेच केळीसह इतर पिकांचेही नुकसान झालेले आहेत. यात तब्बल अंदाजे 50 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी मितावली परीसरात १०० हेक्टरवरील केळी, कापुस सह १० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. आठ महीन्यातच पावसाच्या सुरुवातीस तडाखा बसल्याने तोंडी आलेला घास हा निसर्ग लहरीने हिरावुन घेतला आहे.यामुळे शेतकऱ्यांवर नाहक नामुष्की ओढवली गेली आहे. 

 

नोरा,देवगाव परीसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी प्रा आमदार चंद्रकात सोनवणे ,निवासी नायब तहसिलदार रावसाहेब पेंढारकर,तालुका कृषी अधिकारी डी बी साळुंखे,माजी उपसभापती माणिकचंद महाजन,दुध संस्थेचे माजी अध्यक्ष किरण पाटील,कृषिसहाय्यक मुकेश मोरे,धानोरा तलाठी चंद्रकांत खिल्लारे,बिडगाव तलाठी सर्वर तडवी,माजी तंटामुक्ति अध्यक्ष रोहीदास साळुंखे,कोतवाल तानाजी महाले,राजेश पाटील,रविंद्र पाटील यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते

 

आठ महिन्यांत दुसरा जबरदस्त तडाखा

गेल्या वर्षी २१ सप्टेंबर रोजी वादळाचा जबरदस्त तडाख्याने प्रचंड नुकसान झाले होते. ६ जून रोजी वादळाचा तडाखा केळीला बसला आहे. या आठ महीन्याच्या अंतरावर दुसरा वेगवान फटका बसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.मितावली,पारगाव,देवगाव गावातील एक हजार हेक्टरवरील केळी,कापुस खल्लास होऊन सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. यामुळे पुन्हा लावलेली केळी जमीन झाली असुन कोणते पिक घ्यावे हा ही पेचप्रसंग शेतकरींमध्ये निर्माण झाला आहे.


पंचनाम्याला उद्यापासुन सुरुवात

धानोरा परीसरात बसलेल्या वादळी तडाख्यात नेस्तानाभुत झालेली केळीची पाहणी पूर्ण झाली असुन त्याचा पंचनामा हा दि ८ पासुन सुरु करण्यात येणार आहे. आमदारांनी दोनच दिवसात सदर पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.


"नुकसानग्रस्त भागाची पाहणी पूर्ण झाली असुन त्याबाबत संबंधित विभागाला दोनच दिवसात पंचनामे उरकायला सांगितले आहे.पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या नुकसानासह ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात लावायच्या सांगितले आहे"- आमदार चंद्रकांत सोनवणे

 

बातम्या आणखी आहेत...