आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांत २४ उमेदवारांची माघार; अाज शेवटचा दिवस, अपक्षांच्या मनधरणीसाठी प्रस्थापितांचे प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीतील उमेदवारांचे अंतिम चित्र मंगळवारी माघारीनंतर स्पष्ट हाेणार अाहे. माघारीसाठी शेवटचे दाेन दिवस शिल्लक असताना साेमवारी २० जणांनी माघार घेतली. गेल्या चार दिवसांत २४ उमेदवारांनी माघार घेतली. विराेधी पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे शर्थीचे प्रयत्न करीत अाहेत. लढत साेपी व्हावी म्हणून बहुतांश प्रभागांत माघारीसाठी प्रस्थापितांकडून अपक्षांची मनधरणी केली जात अाहे. 


महापालिकेसाठी १ अाॅगस्ट राेजी मतदान हाेणार अाहे. १९ प्रभागांतील ७५ जागांसाठी ४२७ नामनिर्देशनपत्र वैध ठरले हाेते. यात २०१ अपक्ष उमेदवार हाेते. गेल्या चार दिवसांत साेमवारपर्यंत २४ जणांचे २५ अर्ज मागे घेण्यात अाले अाहेत. माघारीसाठी मंगळवार शेवटचा दिवस अाहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी शेवटचा दिवस अत्यंत महत्त्वाचा राहणार अाहे. राजकीय पक्षांसमाेर अजूनही १७६ अपक्षांचे अाव्हान कायम अाहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत किती अपक्षांची माघार हाेते? याकडे लक्ष लागून अाहे. ७५पैकी काही जागा बिनविराेध करून पक्षाचे खाते उघडण्याचा प्रयत्न सुरू अाहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान पालिकेच्या दुसऱ्या व पाचव्या मजल्यावर जाेरदार राजकीय घडामाेडी हाेणार अाहेत. त्याची सुरूवात सोमवारी दुपारपासून झाली.


गाेंजारण्याकडे दिले लक्ष्य 
विजयात अडथळे ठरणाऱ्या अपक्षांना माघारीसाठी गाेंजारण्याचे प्रकार सुरू अाहेत. साेमवारी एकाच घरातून दाखल केलेले डमी अर्ज माघारीची प्रक्रिया अाटाेपून घेण्यात अाली. रविवारची सुटी व त्यापूर्वी दाेन दिवस केवळ चार जणांनी माघार घेतल्यामुळे साेमवारी व मंगळवारी गर्दी हाेणार हे अपेक्षित हाेते. परंतु, साेमवारी उमेदवारांनी माघारीसाठी हजेरी लावली नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अन्य कामे उरकण्यावर भर हाेता. 


बिनविराेधसाठी प्रयत्न सुरू 
यंदाच्या निवडणुकीत भाजपने सर्व जागांवर उमेदवारी दिली अाहे. तर शिवसेनेच्या चार ते पाच जागांवर पुरस्कृत उमेदवार अाहेत. याशिवाय कांॅग्रेस, राष्ट्रवादी व सपा अाघाडीच्यावतीने ७० जागांवर उमेदवार देण्यात अाले अाहेत. ज्या ठिकाणी थेट राजकीय पक्षांची उमेदवारी नाही अथवा तुलनात्मक सक्षम उमेदवार नाहीत, अशा प्रभागांत बिनविराेधासाठी प्रयत्न सुरू झाले असल्याचे चित्र दिसून अाले. 


उमेदवारी निश्चित झाल्याने डमी अर्ज मागे 
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांकडून काेणाला एबी फाॅर्म मिळेल, याची शाश्वती मिळत नव्हती. राजकीय पक्षांनी देखील गुप्तता पाळल्यामुळे एेनवेळी धाेका हाेऊ नये म्हणून बऱ्याच कुटुंबातून एकापेक्षा जास्त अर्ज दाखल करून ठेवले हाेते. परंतु अाता राजकीय पक्षांची उमेदवारी निश्चित झाल्याने साेमवारी मुलगा, मुलगी अथवा पत्नीचा अर्ज मागे घेण्यावर भर देण्यात अाला. 

 

तीन प्रभागांत ५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न 
महापालिकेसाठी कांॅग्रेस व राष्ट्रवादीची अाघाडी अाहे. मात्र, १९पैकी तीन प्रभागांत दाेन्ही पक्षांनी उमेदवारी दिली अाहे. पाच जागांवर दाेन्ही पक्षांचे उमेदवार समाेरासमाेर अाहेत. माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत समन्वयाने ताेडगा काढण्यासाठी दाेन्ही पक्षांतर्फे प्रयत्न सुरू अाहेत. कांॅग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी पार्टी या तीन पक्षांची अाघाडी अाहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी व कांॅग्रेस या दाेन्ही पक्षांतर्फे प्रभाग १, १० व १६ येथे स्वतंत्र उमेदवारी दाखल केली अाहे. अाघाडी असल्याने काेणत्याही एका पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात राहणे अपेक्षित अाहे. मात्र, दाेन्ही पक्षांना अापलाच उमेदवार तुल्यबळ असून ताे निवडून येईल, अशी खात्री अाहे. त्यामुळे काेणीही माघार घेतलेली नाही. प्रभाग १ क मध्ये दाेन्ही पक्षांचे उमेदवार अाहेत. प्रभाग १० क व ड मध्ये हीच स्थिती अाहे. तर प्रभाग १६ अ व ड या दाेन्ही ठिकाणी दाेघांचेही उमेदवार अाहेत. विशेष म्हणजे प्रभाग १६ ड मध्ये मित्रपक्ष समाजवादी पार्टीचाही उमेदवार अाहे. 


राजकीय नेत्यांकडून फाेनने संपर्क सुरू 
यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या कमी असली तरी राजकीय पक्षांनी एेनवेळी उमेदवारी कापल्यामुळे प्रभागात प्रभाव असलेले अनेक चेहरे निवडणूक रिंगणात अाहेत. अशा उमेदवारांमुळे राजकीय समिकरणे बिघडतील व विजयाची गणित चुकण्याची भीती राजकीय पक्षांच्या उमेदवारांना भेडसावत अाहे. अशा परिस्थितीत ज्या नेत्यांनी उमेदवारी कापली त्यांच्याकडूनच मनधरणीसाठी फाेनवरून संपर्क सुरू अाहेत.

 
बैठकीत ताेडगा नाही 
तीन प्रभागातील पाच जागांबाबत निर्णय घेण्यासाठी रविवारी कांॅग्रेसचे डाॅ. ए. जी. भंगाळे, डाॅ. राधेश्याम चाैधरी तर राष्ट्रवादीचे माजीमंत्री गुलाबराव देवकर व गफ्फार मलिक यांची बैठक झाली. त्यात मात्र, ठाेस ताेडगा निघू शकलेला नाही. 


मंगळवारपर्यंत प्रतीक्षा 
एकाच ठिकाणी मित्र पक्षाचे उमेदवार समाेरासमाेर अाल्याने ताेडगा काढण्याचे प्रयत्न सुरु अाहेत. मात्र, ताेडगा अद्याप निघालेला नाही. मंगळवारी माघारीचा शेवटचा दिवस अाहे. ताेपर्यंत समन्वयाने याेग्य ताेडगा निघू शकेल, अशी दाेन्ही पक्षांना अाशा अाहे. किंबहुना तसे प्रयत्नही सुरू असल्याचे चित्र सायंकाळपर्यंत हाेते. 

बातम्या आणखी आहेत...