आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापी नदीपात्रात बुडून यावल येथील 24 वर्षीय तरूणाचा मृत्‍यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- जळगाव तालुक्याच्या सीमेवरील पिळोदा खुर्द व देवुवाडे या गावांच्या मध्‍ये असलेल्या तापी नदीपात्रात आसिफ हाफिज पटेल या 24 वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यु झाला आहे. ते यावल येथील विरार नगरातील रहिवासी होते.

 

ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. घटनेचे वृत्त समजताच परीसरातील नागरीकांनी व नातेवाईकांनी पिळोदा येथे धाव घेतली.  सोमवारी रात्री नदीपात्रातील मृतदेह सापडला असून मृतदेह जळगाव येथे नेण्यात  आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील देवूलवाडे येथे घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी आसिफ आपल्‍या मित्रासह गेले होते. तेथून परतत असताना ते तापी नदिपात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्‍यांचा मृत्‍यू झाला.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...