आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांपूर्वी शारीरिक, वैद्यकीय चाचणी; २७६ माथाडी कामगारांना नियुक्ती मिळेना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी सुरक्षा रक्षक पदासाठी शासनाने जाहिरात देऊन अर्ज मागवले हाेते. त्यानुसार अालेल्या ८ हजार अर्जातून २७६ जणांची शारिरिक चाचणीतून निवड करून तत्काळ वैद्यकीय तपासणी देखील करुन घेण्यात अाली. मात्र, याला तीन वर्ष उलटून देखील या उमेदवारांना नियुक्ती मिळत नसल्याने वंचित असलेल्या या उमेदवारांनी धुळ्याचे माजी अामदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार अायुक्त (माथाडी) कार्यालयातील निरीक्षकांना साेमवारी घेराव घातला. 


शासनाने ३१ मार्च २०१५ राेजी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध २३ संस्थांवर नेमणूक करण्यासाठी जाहिरात काढून अर्ज मागवले हाेते. त्यासाठी तिन्ही जिल्ह्यातून सुमारे ८ हजार उमेदवारांनी अर्ज केले हाेते. यातून ५०० जणांची पहिल्या चाळणीत निवड केली. त्यांची शारिरीक व मैदानी चाचणी घेण्यात अाली. त्यातून २७६ जणांची यादी वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरवली हाेती. पात्र उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करायला सांगितले. सर्व उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी करून ही अद्यापपर्यंत एकाही उमेदवाराला नियुक्ती देण्यात अालेली नाही. याबाबत उमेदवारांनी अनेकदा कामगार अायुक्त कार्यालयाकडे लेखी पाठपुरावा करूनही उपयाेग झालेला नाही. या २७६ उमेदवारांना नियुक्ती न देता खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून तिन्ही जिल्ह्यातील २३ संस्थांवर सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करण्यात अाल्याचा दावा या उमेदवारांनी केला अाहे. दरम्यान, या उमेदवारांच्या प्रश्नी विधान परिषदेचे धुळे येथील माजी अामदार प्रा. पाटील यांनी ३० मे २०१८ राेजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले अाहे. त्यावरही कारवाई हाेत नसल्याने साेमवारी माजी अामदार पाटील यांनी उमेदवारांसह निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना घेराव घातला. पाटील यांनी वरिष्ठ कार्यालयाला याबाबत अहवाल पाठवण्यात येईल, असे सांगितले. 


यांचा हाेता अांदाेलनात सहभाग 
या अांदाेलनास भूषण माळी(पाळधी), रूपचंद चाैधरी (पाडळसा) नंदु गवळी (धुळे), विजय पाटील(जळगाव), फकिरा तडवी (काेरपावली), चेतन पाटील (शिरपूर), विजय देवरे(धुळे), हेमंत राठाेड (घाेडगाव) नटवर जाधव (अमळनेर), राकेश गवळी (धुळे), किशाेर साेनवणे (चाळीसगाव), धाेंडीराम पगारे, मनाेज रघुनाथ, हुकुमचंद चव्हाण, दीपक शिरसाठ, केशव साेनवणे, परमान रहेमान, प्रवीण पवार, विजय शेगे अादी उपस्थित हाेते. 


उमेदवाराने लिहून ठेवली सुसाइड नाेट 
वैद्यकीय तपासणी पूर्ण केलेल्या २७६ जणांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील घाेडगाव येथील हेमंत कन्हय्यालाल राठाेड या उमेदवाराने नियुक्ती मिळत नसल्याने अात्महत्या करण्याचा विचार अनेकांजवळ बाेलून दाखवला अाहे. त्याने त्याबद्दलची सुसाइड नाेट देखील लिहून ठेवली अाहे. दरम्यान, माजी अामदार शरद पाटील यांनी त्या तरुणाला असा अविचार न करण्याबाबत समजावले अाहे. 


शासकीय दिरंगाईचा फटका 
पात्र उमेदवारांनी तीन वर्षापूर्वी प्रक्रिया पार पाडली असून केवळ शासकीय दिरंगाईमुळे त्यांना नेमणूक मिळत नसल्याचा अाराेप या वेळी माजी अामदार शरद पाटील यांनी केला. या प्रश्नी अायुक्त कार्यालयाकडून सहाय्यक अायुक्त कार्यालयाकडे सुरक्षा मंडळाचा ठरावाची प्रत नसणे, जाहिरातीचा तपशिल पुरवावा, जाहिराती नुसार किती उमेदवारांनी अर्ज केले हाेते, मैदानी चाचणीसाठी किती उमेदवारांची निवड झाली, त्यातून किती निवडले गेले? अादी स्वरुपाची माहिती नसल्याच्या त्रुटी पूर्ण करण्याबाबतची मागणी सहाय्यक कामगार अायुक्त कार्यालयाकडे केली अाहे. त्याबद्दलचा अहवाल ही सहाय्यक कामगार अायुक्त कार्यालयाने लगेच पाठवला असून त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...