आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग लागून ट्रॅव्हल्सच्या तीन बस खाक, वीजेच्या तारांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - येथे ट्रॅव्हल्सच्या बसेसना अचानक आग लागल्याचा प्रकार रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला. वीजेच्या तारांमुळे बसला आग लागल्याची माहिती समोर येत असून, यात कोणीही जखमी नसल्याची माहिती मिळतेय. 


शहराजवळ असलेल्या टिव्ही टॉवरजवळ हा प्रकार घडला आहे. प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या 3 बसेसना ही आग लागली होती. रविवारी दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या येऊन आग विझवेपर्यंत ट्रॅव्हल्सच्या तीन गाड्या जळून खाक झाल्या. या बसेसना वीजेच्या अतिउच्च दाबाच्या तारा तुटल्यामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सर्व बाजुने याची चौकशी करून शहानिशा करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती मिळतेय. 

बातम्या आणखी आहेत...