आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्‍ये एकाच रात्री 4 घरफोड्या, पोलिसांची गस्‍त बंद झाल्‍याने चोरट्यांचे फावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - शहरात विस्तारित भागांमध्ये रविवारी मध्यरात्री तब्बल चार घरफोड्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चाँद नगरमध्ये 3 घरे व त्याला लागून असलेल्या आयशा नगरमध्‍ये एक घरफोडी झाल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. हे चौघेही कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. त्‍यातील एक कुटुंब सोमवारी परतले असता त्‍यांच्‍या ही बाब निदर्शनास आली. त्‍यांच्‍या घरातील रोख रकमेसह सुमारे सत्तर हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.  इतर तीन कुटुंबीय परतल्‍यावर त्यांच्या घरतुन किती ऐवज चोरण्‍यात आला यासंदर्भात उलगडा होईल. विशेष म्हणजे यावल पोलिसांच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून गस्त बंद करण्यात आली आहे. त्‍यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत असल्‍याचे दिसून येत आहे. 

 

चांद नगर येथील सय्यद इरफान निजामुद्दीन हे रविवारी रात्री आपल्या घराला कुलूप लावून शहरात असलेल्या डांग पुरा येथील त्यांच्या जुन्या घरी मुक्कामी होते. सकाळी जेव्हा ते चांद नगरात पोहोचले तेव्हा घराचा कडी-कोंडा तुटलेला असल्‍याचे त्‍यांना दिसले. त्‍यांच्‍या कपाटाची तोडफोड केली होती व त्‍यामध्‍ये असलेली दहा हजाराची रोकड व गल्ल्यात असलेले पाच हजार रुपयाची चिल्लर असे एकूण 15 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवले होते. यासोबतच शंभर ग्राम चांदीचे दागिने व 15 ग्राम सोन्याचे दागिने असा एकूण 70 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबला होता. 


सय्यद यांच्‍या घरासमोरच राहत असलेल्‍या अमृत सुभान पटेल हेदेखील घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. तसेच शेख अमिन शेख यासीन हे देखील घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. या दोघांच्‍याही घरात घरफोडी झाली तर आयशा नगरमधील रहिवासी शेख मुशीर याच्‍यांही घरात घरफोडी झालेली आहे. याची माहिती होताच आजुबाजूच्‍या रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. मात्र पोलिस घटनास्‍थळी तब्‍बल 2 तास उशीरा पोहोचले. 


या सर्व घरांच्‍या पाहणीसाठी अखेर दुपारी एक वाजता सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार गोरख पाटील यांनी घटनास्‍थळी भेट दिली. यावेळी संबंधित नागरिकांना आपल्या घरातील किती रोख रक्कम व ऐवज चोरीला गेले आहे, यासंदर्भात फिर्याद देण्यासाठी पोलीस स्थानकात येण्याचे सांगण्यात आले.


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

 

बातम्या आणखी आहेत...