आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वीच्या प्रवेशासाठी 21 काॅलेजात 7 हजार जागा, शहरात 6 हजार 446 विद्यार्थी उत्तीर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दहावी आणि बारावीची परीक्षा ही करिअरसाठी टर्निंग पाॅइंट असते. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील वाटा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतात. यंदा दहावीत ६ हजार ४४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अकरावीसाठी शहरातील २१ महाविद्यालयात साडेसात हजार जागा उपलब्ध अाहेत. तर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक, आयटीआय, शेतकीशाळा, किमान कौशल्य या अभ्यासक्रमाच्या जागांचा पर्याय खुला आहे.

 

दहावीचा स्टेट बोर्डाचा निकाल ८ जूनला तर सीबीएसई शाळांचा निकाल २९ जूनला ऑनलाइन जाहीर झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची प्रत २० जूननंतर प्राप्त होणार असल्याने त्यानंतरच खऱ्या अर्थाने 'मिशन अॅडमिशन'ला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने सध्या नियाेजन करण्यात येत अाहे.


दहावीच्या विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक विद्याशाखांसह तंत्रशिक्षणाचे शिक्षण देणाऱ्या पॉलिटेक्निकमध्ये करिअरची संधी असते. दहावीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ओढाही पॉलिटेक्निककडेच असतो. शहरातील ८ पॉलिटेक्निक महाविद्यालयांच्या २ हजार ३८० जागा उपलब्ध आहेत. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महिला व मुलांच्या शासकीय आयटीआयमध्ये विविध ट्रेडच्या अभ्यासक्रमानुसार १०९२ जागा उपलब्ध आहेत.

 

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
शहरातील २१ महाविद्यालयांत अकरावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांत ७ हजार २९० जागा आहे. यात कला शाखेसाठी २ हजार ७००, वाणिज्य शाखेसाठी १ हजार ४४०, तर विज्ञान शाखेसाठी ३ हजार १५० जागा उपलब्ध आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाविद्यालयांत मिशन अॅडमिशनची लगबग सुरू होणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात काही प्रमाणात जागा रिक्त राहिल्या होत्या. या वर्षी अकरावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचा २१ महाविद्यालयांत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

बातम्या आणखी आहेत...