आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्यांगनांवर 'चिच्या'ने उधळले ९० हजार रुपये; बसस्थानकातून लांबवले हाेते पावणेसहा लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील नवीन बसस्थानकात पाचाेरा येथील कापूस विक्रीची पावणे सहा लाखांची राेकड असलेली बॅग चाेरट्याने शुक्रवारी (दि.१) लांबवली. पाेलिसांनी एका अाराेपीला अटक केली हाेती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कल्याण येथे दुसऱ्या अाराेपीच्या मुसक्या अावळल्या. त्याने मुंबईतील पबमध्ये नृत्यांगनांवर ९० हजार रुपये उधळून माैजमजा केल्याची माहिती तपासात समाेर अाली. रितेश उर्फ चिच्या किसन शिंदे (वय १८, रा. तुलशीनगर) असे या आरोपीचे नाव आहे. 


जळगावातील नवीन बसस्थानकात १ जून रोजी रात्री ८.२५ वाजेच्या सुमारास पाचोऱ्यासाठी बस जेथे लागते त्या फलाटावर संजय विष्णू वाणी (रा. सातगाव डोंगरी) हे बसची प्रतीक्षा करीत होते. या वेळी दुचाकीवर आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील ५ लाख ७५ हजार ३०० रुपयांची बॅग हिसकावली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापूर्वी आनंदा शांताराम हटकर (रा. रामेश्वर कॉलनी, मंगलपुरीबाबा मंदिराजवळ) याला अटक केली अाहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. त्याची अधिक चाैकशी केल्यानंतर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी रितेश उर्फ चिच्या असल्याचे निष्पन्न झाले. 


परतताना पबमधील महिलेचा आला फोन 
मुंबईत गेल्यानंतर चाेरीच्या पैशांतून चिच्याने मौजमजा केली. पबमध्ये नाचणाऱ्या महिलांवर त्याने तब्बल ९० हजार रुपये उधळले. पोलिस ताब्यात घेऊन जळगावला आणत असताना त्या पबमधील महिलेने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधून 'आया नही तू आज', अशी विचारणाही केल्याचे पोलिसांनी सांगितले. चिच्या हा बालवयातच गुन्हेगारीकडे वळला आहे. त्याने एका सराईत गुन्हेगारासोबत चारचाकीचा काच फाेडून २५ हजार रुपये चोरले होते. या प्रकरणात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची आई जळगाव शहरात लसूण विकण्याचे काम करते. 

बातम्या आणखी आहेत...