आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा हत्‍याकांड: या Viral Videoमुळे पोरधरीच्‍या संशयावरून 5 जणांची निर्घृण हत्‍या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पोरधरीच्‍या संशयावरून पिंपळनेर तालुक्‍यातील राईनपाडा येथे जमावाने 5 भिक्षुकांची निर्घृण हत्‍या केली. महाराष्‍ट्रात जूनमध्‍ये केवळ अफवेवरून जमावाने केलेल्‍या मारहाणीत 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडियावरील अफवा या सर्व हत्‍यांना कारणीभूत ठरल्‍या आहेत. यासंबंधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत असून त्‍याद्वारे लोकांमध्‍ये पोरधरी टोळीची भीती निर्माण करण्‍यात येत आहे. मात्र मुळात हा व्हिडिओच फेक असल्‍याचे आता सिद्ध झाले आहे. 

 

पाकिस्तानमधील आहे व्हिडिओ 
हा व्हिडिओ मुळात पाकिस्‍तानमधील असल्‍याचे आता समोर आले आहे. मुलांच्‍या अपहरणाविषयी पालकांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍यासाठी 'रोशनी' नावाच्‍या संस्‍थेने या व्हिडिओची निर्मिती केली होती. 


व्हिडिओचा अर्धाच भाग भारतात व्हायरल 
मुळात जागरूकता निर्माण करण्‍यासाठी जो व्हिडिओ निर्माण करण्‍यात आला, त्‍याचा अर्धाच भाग भारतात व्‍हायरल होत आहे. आणि या व्हिडिओलाच खरे मानून लोकांमध्‍ये भीती पसरवण्‍यात येत आहे. व केवळ संशयावरून जमाव निर्घृण हत्‍या करत आहे. हीच भीती धुळ्यात 5 जणांच्‍या निर्घृण हत्‍येस कारणीभूत ठरली. 


अफवा पसरवाल तर कठोर कारवाई- DSP दत्‍ता पडसलगीकर 
या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर यांनी अफवा पसरवणा-यांना गंभीर इशारा दिला आहे. अफवेमुळे होणारे हत्‍यांचे सत्र थांबवण्‍यासाठी पोलिस महासंचालकांनी जनतेला आवाहन केले आहे की, 'अशा प्रकारच्‍या काही घटना तुमच्‍या निदर्शनास आल्‍यास ताबडतोब याची माहिती पोलिसांना कळवा. कृपया व्‍हॉट्स अप तसेच सोशल मिडीयावरील अफवांवर विश्‍वास ठेवू नका. तसेच त्‍यांना शेअरही करू नका. असे करताना कोणी आढळले तर त्‍याच्‍यावर कठोर कारवाई केली जाईल.'


दिव्य मराठी आवाहन: सजग राहा, पण कायदा हाती घेऊ नका
काही ‘उत्साही’ लोक आपल्याकडे आलेला मेसेज फक्त गावाचे नाव बदलून पुढे पाठवत अाहेत. यातून गैरसमज पसरून हिंसक पडसाद उमटत आहेत. देशभरातील दहा राज्यांत हिंसक जमावाने पोरधरी समजून ३० जणांचे बळी घेतले. महाराष्ट्रात ही संख्या सर्वाधिक ८ झाली आहे. समाजात घडणाऱ्या अशा घटनांबाबत जागरुक राहणे हे प्रत्येक नागरिकाचेच कर्तव्य अाहे. मात्र गैरसमजातून कायदा हाती घेऊन एखाद्याच्या जीव घेण्याचा अधिकार काेणालाच नाही. त्यामुळे सर्वांनाच नम्र अावाहन अाहे की, सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. कुठल्याही अफवांना बळी पडू नका, त्याची खातरजमा करून घ्या. समाजात काही चुकीचे घडत असेल किंवा अशा दुष्प्रवृत्तीच्या व्यक्ती आढळून आल्या तर त्यांना पकडून पाेलिसांच्या स्वाधीन करा, स्वत: कायदा हातात घेऊ नका.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, पुर्ण व्हिडिओ.... 


   

 

बातम्या आणखी आहेत...