आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Crime: यावलमध्ये व्यापाऱ्याला बंदूक, चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न; CCTV फुटेज सापडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - चोरट्यांनी संभाजी अशोक येवले या व्यवसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून आणि पिस्तुलचा धाक दाखवून रोकड लुटण्याचा प्रयत्न शनिवारी केला होता. या प्रकरणी रविवारी यावल पोलिसांत तीन अज्ञातांविरूध्द आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच येवले यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनी पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरल्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. त्यांची ओळख पटवण्यासाठी सर्व फोटो आणि व्हिडिओ जिल्ह्यातील इतर पोलिस स्टेशनला पाठवण्यात आले आहेत. यासह चोरट्यांशी झालेल्या झाटापटीत पिस्तुलातील एक काडतूस घटनास्थळी पडले. ते सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे. 


शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात फर्टीलायझरचा व्यवसाय करणारे संभाजी अशोक येवले (40) आपला दैनंदिन व्यवसाय उरकून घरी येत होते. शनिवारी रात्री सुमारे 45 हजार रुपये एका पिशवीमध्ये ठेवून येत असताना फैजपूर रस्त्यावर पेट्रोल भरण्यासाठी ते थांबले होते. यानंतर हॉटेल भाग्यश्रीच्या जवळ त्यांच्या मागून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर तोंडाला रूमाल बांधुन तीन अज्ञात आले. तसेच त्यांचा रस्ता अडवून एकाने मिरची पावडर त्यांच्या डोळ्यावर फेकली. दुसऱ्याने पिस्तुल आणि तिसऱ्याने चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. येवले यांनी आरडा-ओरड केल्याने स्थानिकांनी गर्दी केली. गर्दी पाहताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावल पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे पुढील तपास करत आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...