आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीच्या थकीत माेबदल्यासाठी महिलेने घेतले विष;चाळीसगावातील घटना, उपचार सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- कन्नड घाटाच्या पायथ्याशी बोढरे शिवारात नव्याने तयार होत असलेल्या सौरऊर्जा (सोलर) प्रकल्पासाठी १९ एकर जमीन दिल्यानंतरही पूर्ण माेबदला मिळाला नाही. यामुळे हतबल झालेल्या शेतकरी कुटुंबातील लीलाबाई एकनाथ राठोड (वय ५५) यांनी शनिवारी प्रकल्प अावारातच विष घेऊन अात्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.     


लीलाबाई राठोड यांनी शनिवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास प्रकल्प अावारातच कीटकनाशक अाैषध घेऊन अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  सुरक्षारक्षक सिकंदर शेख यांना लीलाबाई राठोड या सौरऊर्जा प्लेट्सजवळ जमिनीवर शनिवारी सकाळी ९.३० वाजता पहुडलेल्या दिसल्या. यानंतर शेख यांनी सोबतच्या सुरक्षारक्षकांना बाेलावले. त्यांना जवळच ‘फाॅसफिल’ नावाची कीटकनाशक अौषधाची बाटली आढळली. यानंतर सुरक्षा विभागाचे प्रमुख माॅन्टी शेख, सिकंदर शेख, रियाज शेख यांनी लीलाबाईंना तातडीने खासगी दवाखान्यात अाणताच डाॅ. जयवंत देवरे यांनी तातडीने उपचार सुरू केले. याबाबत माहिती मिळताच पाेलिस दवाखान्यात दाखल झाले. मात्र, लीलाबाईंची  स्थिती जबाब देण्यासारखी नसल्याने ते माघारी फिरले.

बातम्या आणखी आहेत...