आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या बेराेजगार तरुणाने भररस्त्यात अंगावर पेट्राेल अाेतून पेटवून घेतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालवाहतुकीच्या रिक्षेने हेमंत गाेपनारायणला रुग्णालयात नेताना त्याच्या वडीलांसह वाहतूक शाखेचे पाेलिस. - Divya Marathi
मालवाहतुकीच्या रिक्षेने हेमंत गाेपनारायणला रुग्णालयात नेताना त्याच्या वडीलांसह वाहतूक शाखेचे पाेलिस.

जळगाव- पदव्युत्तर शिक्षण (एम,ए.) घेतलेल्या सुशिक्षित बेराेजगार तरुणाने घरातून पाण्याची रिकामी बाटली अाणली. यात पेट्राेल विकत अाणून ते अंगावर अाेतले. एवढेच नव्हे, तर क्षणाचाही विलंब न करता माेकळ्या जागेत येऊन त्याने अागकाडी अाेढून स्वत:ला पेटवून घेतले. ही थरारक घटना साेमवारी (दि.११) सकाळी ११.१५ वाजता गुजराल पेट्राेलपंपाजवळील महामार्गालगत घडली. या घटनेत हा तरुण ८१ टक्के भाजला गेला. 


हेमंत प्रभाकर गोपनारायण (वय ३८, रा. श्रीरत्न कॉलनी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हेमंत हा बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झालेले प्रभाकर गोपनारायण यांचा मोठा मुलगा आहे. त्याचे लग्न झालेले नाही. तो सध्या बेरोजगार अाहे. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. त्याने दोन वेळा घराबाहेर ये-जा केली. प्रत्येक वेळी हातात पाण्याची बाटली घेऊन तो बाहेर येत होता. मित्रांना पाणी पिण्यासाठी बाटली घेऊन जात असल्याचा समज त्याच्या कुटुंबीयांचा झाला. यानंतर ११ वाजता त्याने या बाटलीत पेट्रोल घेतले. गुजराल पेट्रोल पंपाजवळील आदर्श हॉटेलच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत येऊन त्याने बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतले. क्षणार्धातच सोबत अाणलेल्या काडीपेटीने स्वत:ला पेटवून घेतले. या वेळी रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक, परिसरातील नागरिकांनी त्याच्याकडे धाव घेतली. परंतु, प्रत्यक्षात विझवण्याची हिंमत कोणी केली नाही. अखेर श्रीरत्न कॉलनीतील रहिवासी शक्ती महाजन यांनी धावत जाऊन घरातून गोधडी आणली. ती त्याच्या अंगावर टाकली. यानंतर स्वप्नील नेमाडे, राहुल पाटील, किरण माहुरे, विक्की देवराज यांच्यासह वाहतूक पोलिस शिवाजी माळी, सुनील निकम, संजय पाटील व मनोरे यांनी माती टाकून हेमंतला विझवले. एका मालवाहतुकीच्या रिक्षेतून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताे ८१ टक्के भाजल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. त्याचे दोन्ही पाय, गुप्तांग, पाेट, छाती, चेहरा भाजला गेला. तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


बघ्यांची गर्दी, मदतीला काेणी येईना 
हेमंत पेटत असताना या परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु, एका हाताच्या बोटावर मोजता येईल, इतक्याच लोकांनी त्याला विझवण्याचा प्रयत्न केला. त्याला विझवल्यानंतर रुग्णालयात उपचारार्थ पाेहचवण्यासाठी अनेक रिक्षांना हात देण्यात अाला. पण एकही प्रवासी वाहतूक करणारा रिक्षाचालक थांबला नाही. अखेर एका मालवाहतुकीच्या रिक्षाचालकाने माणुसकी दाखवून भाजलेल्या हेमंतला रुग्णालयात पोहचवले. 


आई-वडिलांना अश्रू झाले अनावर 
हेमंतने स्वत:ला पेटवून घेतल्यानंतर श्रीरत्न कॉलनीतील काही नागरिकांनी त्याला ओळखले. जवळच राहत असलेल्या त्याच्या आई-वडिलांना माहिती दिली. त्यांनीच मालवाहू रिक्षेतून त्याला रुग्णालयात आणले. दरम्यान, ८० टक्के भाजल्याने त्याला प्रचंड त्रास हाेत होता. त्याची अवस्था पाहून आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते. हेमंतने असे टाेकाचे पाऊल का उचलले असावे? हे त्याच्या आई-वडिलांना सांगता आले नाही. त्याचे शिक्षण एम.ए. पर्यंत झालेले अाहे. गेल्या अनेक वर्षांपासून ताे बेराेजगार अाहे. 


पोलिसांनी घेतली माहिती 
घटनेनंतर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बापू रोहाेम, प्रदीप चौधरी, गोपाळ चौधरी, शरद पाटील, नीलेश सूर्यवंशी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर त्यांनी दुपारी हेमंतचा जबाब घेण्यासाठी रुग्णालय गाठले होते. परंतु, बेशुद्ध असल्यामुळे त्याचा जबाब पाेलिसांना नाेंदवून घेता आला नाही. 


गोपनारायण कुटुंबाची पार्श्वभूमी 
पेटवून घेतल्याने गंभीर जखमी असलेल्या हेमंतचे वडील प्रभाकर गोपनारायण हे बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना हेमंत, प्रशांत व नीलेश अशी तीन मुले आहेत. तिघे अविवाहीत आहेत. हेमंत व प्रशांत जळगावात राहतात तर नीलेश हा बडोदा येथे एका खासगी कंपनीत नोकरीस असून तेथेच राहतो. 

बातम्या आणखी आहेत...