आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकींची समोरसमोर झालेल्‍या धडकेत 3 जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- फैजपूर रस्त्यावर चितोडा गावाच्या जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्‍याने तीन जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.


अंकलेश्वर ब्रहानपूर राज्यमार्गावर फैजपूर रस्त्यावर असलेल्या महाविद्यालयाच्या पुढे चितोडा गावाजवळ सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास MH19 N 26 17 व MH19 R 84 69 या दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. धडक इतकी प्रचंड होती की दोघ दुचाकींचा चक्काचूर झाला. यात राजू रमजान तडवी (वय 35, राहणार भालोद) योगेश सतीश भालेराव (वय 28, राहणार भालोद) व किरण वसंत कोळी (रहाणार सुतार वाडा, यावल) हे तीन जखमी झाले. अपघातानंतर जखमी रस्त्यावर पडले होते. त्‍यांच्‍या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.


यांदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे व सुनील बारी हे फैजपुर कडून यावलला येत होते. त्यांनीच जखमींना तात्काळ मदत केली व प्रवासी वाहतूक करणाऱ्या Mh19 Y 55 11 या वाहनाला थांबवले व  त्यामधून जखमींना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.  येथे जखमींवर प्राथमिक उपचार करण्‍यात आले. राजू तडवी व किरण कोळी याची प्रकृती चिंताजनक असून त्यांस तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. इतर जखमींवर यावलला उपचार सुरू आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...