आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपळनेर-सटाणा रस्त्यावर अपघातांची मालिका सूरूच, कंटेनरची एसटीला धडक, थोडक्‍यात बचावले प्रवासी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर - पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील अपघाताची मालिका सुरूच असून देशशिरवाडे शिवारात आज दुपारी १ वाजता एसटी बस व कंटेनर यांच्यात मोठा अपघात होता होता टळला.

 

पिंपळनेरहुन नाशिककडे जाणा-या साक्री-नाशिक बसला ( क्रमांक MH 20 BL 1603) मागून येणा-या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे एसटी बस रस्त्याच्या कडेला ढकलली गेली व पलटी होता होता वाचली. यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.  यात अनेक विद्यार्थीही प्रवास करत होते. एसटीचे मागील भागाचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने एसटीला मागून धडक बसली, अशी माहिती आहे. एसटी नाशिक कडे जात होती तर कंटेनर पिंपळनेरकडून सटाण्‍याकडे अवजड मशीन घेऊन जात होता.

 

घटनास्थळी बघ्‍यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेत कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती प्रवाशांनी दिली. दरम्यान याच मार्गावर शेलबारी घाटात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींना अपंगत्व आले आहे. पिंपळनेर-सटाणा रस्ता अपघाताचे क्षेत्र बनले आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अपघाताचे फोटोज... 

 

बातम्या आणखी आहेत...