आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर डंपरची दुचाकीस्वारास धडक; रस्त्याच्या कडेला फेकले गेल्यामुळे बचावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल त्रिमूर्तीसमोर डंपरने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेल्याने जखमी झाला. डंपरचालक पसार झाला. 


सुभाष अमृत पाटील (वय ६२, रा.जिजाऊनगर) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. पाटील हे एमआयडीसी परिसरातून दुचाकीने (क्रमांक एमएच-१९, बीवाय, ५०७२) शहराकडे येत असताना त्यांना मागून भरधाव येणाऱ्या डंपरने (क्रमांक एमएच-१९, झेड, ३७५७) धडक दिली. यात पाटील यांचा तोल गेल्याने ते दुचाकीसह रस्त्याच्या डाव्या बाजूला पडल्याने बचावले; पण त्यांच्या डाव्या पायाचा गुढघा व उजव्या हाताच्या मनगटास दुखापत झाली अाहे. डंपरचालकास थांबवण्यासाठी त्यांनी आरडा-ओरड केली. पण, क्लिनरने त्यांच्याकडे पाहुन डंपर थांबवले नाही. उलट गती वाढवून तो अजिंठा चौफुलीच्या दिशेने निघून गेला. पाटील यांच्यासह नागरिकांनी डंपरचा क्रमांक नोंदवून ठेवला होता. यानंतर मयूर कोल्हे व नागरिकांनी पाटील यांना जिल्हा रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचार केल्यानंतर ते तक्रार दाखल करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेले. डंपरमालकाकडून काही प्रतिनिधी पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी पाटील यांना फाेनवरुन दुचाकी दुरुस्त करुन देण्यासह उपचारासाठी लागणारा खर्च देणार असल्याचे सांगितले. 


डंपरचालकाची मुजोरी 
बुधवारी अजिंठा चौफुलीवर डंपरच्या धडकेत माजी सैनिक सुरेश मराठे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या सलग दुसऱ्या दिवशी भरधाव डंपरने पाटील यांना धडक दिली. यात सुदैवाने पाटील हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर मुजाेर डंपरचालक पसार झाला.

बातम्या आणखी आहेत...