आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासींनी मागण्यांसाठी भरउन्हात काढला मोर्चा, तहसीलदारांना दिले निवेदन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - आदिवासी एकता परिषदेच्या वतीने विविध 16 मागण्यांकरीता बुधवारी अधिकार मोर्चा काढण्यात आला. 43 डिग्रीहून अधिक तापमानात दुपारी 12 वाजता आदिवासी प्रकल्प कार्यालयापासून थेट तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघालाय यात मोठ्या संख्येत आदिवासी महिला, पुरूष, अबालवृध्दांनी यात सहभागी होत घोषणांनी शहर दणाणले होते.

 

स्वातंत्र्यानंतर आजही आदिवासी त्यांच्या विविध अधिकारांपासून वंचितच आहेत शासनाच्या विविध योजनांकरीता त्यांना लढा द्यावा लागतो हे प्रामुख्याने शासनकर्त्यांच्या निर्दशनास यावे म्हणून आदिवासी एकता परिषदच्यावतीने बुधवारी विविध 16 मागण्यांकरीता अधिकार मोर्चा काढण्यात आला. बुरूज चौकातुन पुढे भुसाळ टि-पॉइंट पर्यंत व तेथुन तहसील कार्यालयासमोर मोर्चा धडकला. येथे परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड यांनी मोर्चेकरींना मार्गदर्शन केले व शासनाकडे मागण्यासंर्दभातील लढ्याची माहिती दिली येथे तहसीलदार कुंदन हिरे, पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मोर्चात जिल्हाउपाध्यक्ष एकनाथ आहिरे, यशवंत आहिरे, मुकेश वाघ, दिलीप सोनवणे, रामभाऊ ठाकरे, भगवान मोरे, किरण सोनवणे, राजू गायकवाड, अशोक भिल, देविदास भिल, करण सोनवणे, संतोष भिल, रायसिंग सोनवणे, रमजान तडवी, सुनिल भिल सह मोठया संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते, समाज बांधवांची उपस्थिती हाेती. 

बातम्या आणखी आहेत...