आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्क कापडावर तरंगती योगासने; 'एरियल स्पोर्ट‌्स' अाता जळगावात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या एरियल स्पोर्ट््स या खेळाचे प्रशिक्षण केंद्र जळगावात नुकतेच सुरू झाले आहे. सिल्क कापडाच्या साह्याने हवेत योगासने करण्याचा हा प्रकार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या व्यायामासह क्रीडा क्षेत्रात सहभागासाठी या खेळाकडे पाहिले जाते. या खेळाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा २२ ते २६ मेदरम्यान बडोदा येथे झाली. या स्पर्धेत शहरातील १५ खेळाडूंनी सहभाग नाेंदवला होता. 


काशिनाथ पलोड स्कूलचे क्रीडा शिक्षक नरेंद्र भोई यांनी या खेळाच्या पंच परीक्षेत यश मिळवल्यानंतर शहरातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. सध्या पलोड स्कूलसह सेंट टेरेसा व उज्ज्वल स्प्राऊटर या तीन शाळांमधील विद्यार्थी एरियल स्पोर्ट््सचे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षणाला व्यापक स्वरुप देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 


दोन राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग 
या खेळाचे प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर शहरातील खेळाडू विद्यार्थ्यांनी बडोदा व झांसी येथे झालेल्या दोन राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे. देशातील १८ राज्यांमधील ३७५ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पहिल्याच प्रयत्नात खेळाडूंची चांगली कामगिरी केल्याचे प्रशिक्षक भोई यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. 


असा आहे खेळ 
सिल्कचा कापड २५ फूट उंचीवर बांधलेला असतो. संपूर्ण कापडाची लांबी ५० फूट असते. या कापडाचा आधार घेऊन खेळाडूंना त्यावर विविध प्रकारची आसने करायची असतात. या खेळातून खेळाडूंच्या पाठीची लवचिकता, हातांची पकड, शरीराचे संतुलन यांचा व्यायाम होत असतो. शिवाय योगासनातून मिळणारे इतर लाभ देखील त्यांना होत असतात. 

बातम्या आणखी आहेत...