आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावहून पुणे, सुरतला जाेडण्यासाठी विमान कंपनीचा राज्य शासनाला प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-केंद्र सरकारने देशभरातील टू टियर सिटींना मेट्राे सिटींशी विमानसेवेने जाेडण्यासाठी उडान याेजना राबवण्यात येत अाहे. याच धर्तीवर राज्यातील पुणे, काेल्हापूर, इंदूर अाणि सुरत सारख्या देशातील टू टियर सिटींना एकमेकांशी जाेडण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव उडान योजनेंतर्गत राज्यात विमानसेवा देणाऱ्या एअर डेक्कन चार्टर सर्व्हिसेस कंपनीतर्फे विमान प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला अाहे. 

 

हैद्राबाद येथे नागरी उड्डयन मंत्रालयातर्फे गेल्या अाठवड्यात विमान कंपन्यांच्या 'एअर-शाे'चे अायाेजन केले हाेते. या एअर-शाे करिता नागरी उड्डयन मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी व राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती. या वेळी एअर डेक्कन कंपनीतर्फे कंपनीचे व्यवस्थापन व विपणन विभागाचे राष्ट्रीय प्रमुख जीगर थालेश्वर यांनी हा प्रस्ताव दिला. ज्या प्रमाणे केंद्र सरकारने देशातील शहरांना जाेडण्यासाठी पुढाकार घेऊन सर्वसामान्यांच्या अावाक्यात विमान सेवा अाणण्यासाठी भार साेसला अाहे. त्याप्रमाणे राज्य सरकारने राज्यातील दाेन टू टियर सिटींना एकमेकांशी जाेडण्यासाठी पुढाकार घेतल्यास राज्यात व्यवसाय व उद्याेग वाढीला चालना मिळेल. 

 

सकारात्मक प्रतिसाद 

हवाई वाहतूक मंत्रालयातर्फे या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला अाहे. त्याला मंजुरी मिळाल्यास जळगावातून पुणे, काेल्हापूर, इंदूर, सुरत शहरांना जाेडण्याच्या दृष्टीने एअर डेक्कनसह विविध कंपन्या विचार करू शकतात. या शहरांशी व्यावसायाने जळगावची नाळ जुळली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...