आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेदरकारपणे कार चालवणाऱ्या पाचोऱ्याच्या मद्यपी डाॅक्टरला जळगावात नागरिकांचा चोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये जेवण व मद्यपान करून कारने घराकडे जात असलेल्या पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील मद्यधुंद डॉक्टरने बेदरकारपणे चारचाकी चालवत अनेक वाहनांना कट मारला. अखेर डी-मार्टजवळ एका दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर संतप्त जमावाने कारमधून बाहेर काढून चाेप दिला. कारच्या काचाही फोडल्या. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. 


दिलीप हरिभाऊ परदेशी असे त्या डॉक्टरचे नाव आहे. परदेशी हे पाचोऱ्यावरून जिल्हा रुग्णालयात एका कामानिमित्त आले होते. तेथील काम आटोपल्यानंतर त्यांनी एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये जेवण व मद्यपान केले. त्यानंतर ते एम.एच.१९ सी.व्ही.१४८४ क्रमांकाच्या कारमध्ये पाचोरा जाण्यासाठी निघाले. एमआयडीसीतून पाचोऱ्याकडे जात असताना मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्यांना कार चालवता येत नव्हती. ते नागमोडी वळणे घेत महामार्गावरून बेदरकारपणे कार चालवत होते. यावेळी अनेक वाहनांना त्यांनी कट मारला. ईच्छादेवी चौकातून पाचोऱ्याकडे जाण्यासाठी वळले. ईच्छादेवी चौकातील नागरिक त्यांच्या कारच्या मागे धावले. डी-मार्टजवळ आल्यानंतर त्याच्या कारची एका दुचाकीला धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वार खाली पडला. नागरिकांनी डॉ. परदेशी यांची कार अडवली. त्यांना कारमधून मारहाण ओढून मारहाण केली. दगड मारून त्यांच्या कारच्या काचा फोडल्या.


टॅँकरने दुचाकीला उडवले 
शहरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हॉटेल काशिनाथजवळून शहराकडे येण्यासाठी वळत असलेल्या शेख इरफान शेख गफ्फार व तय्यब अरमान पटेल (रा. पोलिस कॉलनी, एमआयडीसी) या दुचाकीस्वारांना भरधाव असलेल्या एम.एच. ४८ ए.जी.८११६ क्रमांकाच्या टँकरने समोरून धडक दिली. टँकरचालक मद्यधुंद असल्याचे या तरुणांनी पोलिसांना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...