आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीच्या वयाबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जि.प.वर छत्री माेर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन दुप्पट वाढ करून देताना त्यांच्या निवृत्तीची वयाेमर्यादा मात्र पाच वर्षांनी कमी केली अाहे. ही मर्यादा पूर्ववत ठेवण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर छत्री माेर्चा काढला.

 

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे मानधन वाढ व भाऊबीज दुप्पट देण्याचा शासकीय निर्णय घेण्यात अाला. हा निर्णय घेतांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षावरून ६० वर्षे करण्यात अाले. शासनाने एका हाताने देताना दुसऱ्या हाताने काढून घेतल्याची भावना अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये अाहे. यासंदर्भात कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेवर छत्री माेर्चा काढण्यात अाला. महिला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर उन्हात छत्री उघडून ठिय्या अांदाेलन केेले. निवृत्तीचे वय वाढवा अन्यथा ५ वर्षांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात अाली.

 

अांदाेलनात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले हाेते. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील, सुषमा चव्हाण, चेतना गवळी, साधना पाटील, सुनंदा नेरकर, रमा अहिरे, पुष्पा परदेशी, कल्पना जाेशी, शाेभा जावरे, सविता महाजन, मीनाक्षी चाैधरी, मंगला नेवे, अाशा जाधव यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.

 

बातम्या आणखी आहेत...