आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्द असाल तर कोर्टात माझ्याविरोधात लढा, अंजली दमानियांचे खडसेंना आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भाजपचे माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसेंचे पद गेल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. थर्ड ग्रेडेड राजकारण करण्यापेक्षा मर्द असाल तर माझ्याविरुद्ध कोर्टात येऊन लढून दाखवा, असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांना दिले आहे. खडसे यांनी न्यायालय व पोलिसांची दिशाभूल करून आपल्याविरूध्द गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे धनादेश प्रकरणात आमदाराच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करणार असल्याचेही दमानिया यांनी सांगितले.


दहा भुजबळ,दहा खडसे एकत्र आले तरी पुरून उरेन...
खडसे आणि भुजबळ हे दोन्ही ओबीसी नेते एकत्र येत असल्याचे माहित पडले. या दोन्ही नेत्यांविरूध्द मी लढत आहे. असे दहा भुजबळ, दहा खडसे जरी एकत्र आले तरी त्यांना मी पुरून उरेन. भ्रष्ट लोक एकत्र येत असतील तर लोकांनीच ठरवावे. ते पुढे निवडूनही येणार नाहीत, असेही दमानिया म्हणाल्या.


रवी पुजारी गँगकडून धमकी...
मला अंडरवर्ल्डकडून दोन धमक्या आल्या. आताची जी धमकी आली ती रवी पुजारी गँगकडून आली. त्यानंतर माझ्याविरोधात जाहीर सभांमध्ये बोलल्या गेले. माझे नाव आणि फोन नंबर आणि खाली खट्टी मिठी बाते करणे के लिए फोन करे अशा चिठ्ठया जळगाव,भुसावळ रेल्वे स्थानकावर, रेल्वेमध्ये लावण्यात आल्या.अकरा ठिकाणी अशा चिठ्ठया लावण्यात आल्या होत्या, असे यावेळी अंजली दमानिया म्‍हणाल्‍या.

 

गिरीश महाजन, सुरेश जैनही भ्रष्ट  
खडसेंनी मी एका मंत्र्याची प्यादी असल्याचा आरोप केला होता. जळगावात गिरीश महाजन हे मंत्री आहेत. सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत. बहुतांश राजकारणीही सारखेच आहेत. खडसे इतकाच मला गिरीश महाजन व सुरेश जैन यांचा राग आहे. हे दोन्ही भ्रष्ट मंत्री असल्याचाही त्यांनी आरोप केला. तुमचे राजकारण तुमच्याच खिशात ठेवा. या प्रकरणात महाजनांचे नाव घेण्याचा प्रश्नच नाही.त्यांचा एक कागदही मी घेतला नाही.खटोड नावाच्या बिल्डरने पांझरापोळ येथील एस.टी.महामंडळाचा मोठा गट पचवून राजकारण्यांना वाटला.यातील पाच प्लॉट गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन व पाच प्लॉट रोहिणी खडसे यांच्या नावावर असल्याचाही त्यांनी आरोप केला.


एसीबीच्या क्लिनचिटचे राजकारण...
भोसरी प्रकरणात एसीबीकडून बेसीक चौकशी झाली नाही.या प्रकरणात खडसेंना क्लिनचिट देऊन टाकण्याची घाई करण्यात आली.फडणवीस खडसेंना घाबरत असतील.भाजपची विकेट जावू नये.खडसे पक्षाबाहेर जातील,या भितीपोटी एसीबीच्या क्लिनचिटचे नाटक करण्यात आले आहे, असा आरोप त्‍यांनी केला.

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...