आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या ६२ व्या वर्षी चाळीसगावचे नगरसेवक अानंदा काेळी दहावी उत्तीर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- मैत्री अन् शिक्षणाला वयाची अट लागत नाही, ही म्हण तितकीच खरी. परंतु, जर नशिबी गरीबीच असेल तर इच्छा असूनही काहींना शिक्षण अपूर्ण साेडावे लागते. अपूर्ण राहिलेली शिक्षणाची इच्छा येथील ज्येष्ठ नगरसेवक अानंदा चिंधा काेळी यांनी वयाच्या चक्क ६२ व्या वर्षी पूर्ण केली. शुक्रवारी लागलेल्या निकालात ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले अाहेत. 


उमेद न हारता जिद्दीने काेळी यांनी दहावीची परीक्षा दिली. पाेटाची खळगी भरण्यासाठी बालपणापासून काबाड कष्ट अाणि कुस्तीचा अाखाडा जिंकता...जिंकता ते दहावी उत्तीर्ण हाेण्याचे जणू काही विसरले हाेते. ते उत्तम कुस्तीपटू असून ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चाैधरी याने सुरवातीला काेळी यांच्याच तालमीत कुस्तीचे धडे घेतले. अाता राजकीय, व्यवसायिक ठिकाणी शिक्षणाची अट लागू हाेणार असल्याचे संकेत मिळू लागताच दहावीची परीक्षा उत्तीर्ण हाेण्याचा चंग अानंदा काेळी यांनी बांधला अाणि ते वयाच्या ६२ व्या वर्षी दहावीची परीक्षा ६३ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाले. ते पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले अाहेत. ते आदिवासी कोळी महासंघाचे िजल्हाध्यक्षही आहेत. चाळीसगावचे उपनगराध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. 


उपनगराध्यक्ष असताना अपयश 
उपनगराध्यक्ष असतांनाही त्यांनी एकदा दहावीची परीक्षा दिली होती. परंतु, तेव्हा ते दाेन विषय राहून गेले होते. िशक्षणाचे महत्त्व ते जाणून होते. त्यामुळे त्यांनी यावर्षी १७ नंबरचा परीक्षा अर्ज भरुन पुन्हा परीक्षा दिली. 

बातम्या आणखी आहेत...