आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगावात पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला; शिवसेना शहरप्रमुखांसह दोघे जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक नाना उर्फ श्यामलाल कुमावात यांच्यासह दोघांवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने लाकडी दांडा व कोयत्याने हल्ला केला. त्यात तिघेही जखमी झाले. ही घटना साेमवारी (दि.१२) दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील धुळे रोडवरील कॉलेज चौफुलीवर घडली. 


हल्ल्यात शामलाल कुमावत बालंबाल बचावले. त्यांनी डोक्याच्या व नंतर पाेटाच्या दिशेने हाेत असलेला तीक्ष्ण हत्याराचा वार चुकवला. त्यात त्यांच्या तीन बाेटांना गंभीर इजा झाली. घाट रोडवरील दाेेन नगरसेवकांमधील वाद पालिकेच्या निवडणुकीपासून सुरू असूून वादाची ठिणगी मागील गेल्या महिन्याच्या अखेरीस पडली हाेेती. मारहाणीपर्यंत वाद पाेहाेचला हाेता. त्याच कारणाने दाेन्ही गट पुन्हा साेमवारी समाेरासमाेर भिडले. भरदिवसा अन् महत्वाचे म्हणजे गर्दीच्या ठिकाणी नगरसेवकावर एका दुसऱ्या नगरसेवकाच्या टाेळक्याने हत्यार हातात घेऊन हल्ला चढवल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा ठाकला. शिवसेनेचे शहरप्रमुख श्यामलाल कुमावत आपले सहकारी युवराज कुमावत व नीलेश गायके यांच्यासोबत वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी धुळे रस्त्यावरील कॉलनी परिसरात गेले होते. तेथून परतत असताना हातात लाकडी दांडा व कोयत्यासारखे धारदार हत्यार असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांची दुचाकी अडवून तिघांवर हल्ला केल्याची माहिती जखमी झालेले नीलेश गायके यांनी दिली. हल्लेखाेरांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी गायके यांनी केली. 

 

१० मिनिटांचा थरार 
प्रत्यक्षदर्शींशी 'दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीने चर्चा केली. ७ ते १० मिनिटांचा हाणामारीचा हा थरार हाेता. तीन तरूण चिंचेच्या झाडाखाली अाडाेशाला थांबून काेणाची तरी प्रतीक्षा करीत हाेते. त्यातील एकाच्या हातात लाकडी दांडा हाेता. दुचाकीवर नाना कुमावत अन् गायके अाले असता त्यांना याच तरूणांनी अडवून मारहाण सुरू केली. त्यातील एकाने कुमावत यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला तर कुमावत यांना वाचवायला नीलेश गायके समाेर अाले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात अाला. लागलीच एकाने कुमावत यांच्यावर धारदार हत्यार चालवले. नंतर झटापट झाली. त्यात चहाच्या हाॅटेलमधील साहित्य एकमेकांवर भिरकावण्यात अाले. एका जखमीस दवाखान्यात न्यायचे असल्याने नागरिकांनी वाहने थांबवली मात्र तीन वाहने थांबलेच नाही. शेवटी रिक्षा चालकास बळजबरीने थांबवून जखमीस तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात अाले. 

बातम्या आणखी आहेत...