आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रागाच्या भरात भावासह साेडले घर, कानपूरला जाऊन पाण्याच्या बाटल्या विकल्या, अखेर 8 महिन्यांनी घरी पोहोचलो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ/मुक्ताईनगर- भावासह घरातून पळून गेलेला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता नीलेश भिल अखेर मंगळवारी कुटुंबीयांकडे परतला.  दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास गाेरखपूरचे पाेलिस मुक्ताईनगरात अाले व त्यांनी नीलेशला कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. आठ महिन्यांपासून पोटच्या गोळ्याची आतुरतेने वाट पाहणारी अाई  सुंदरबाई यांनी नीलेश दिसताच आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. घर साेडल्याचे कारण व या अाठ महिन्यांच्या वृत्तांत नीलेशने कथन केला ताे त्याच्याच शब्दांत..  

 

> अाई-वडील रागवायचे म्हणून भरात मी, लहान भाऊ गणपतसह घरातून पळालाे. भुसावळ गाठले. स्टेशनवर उभ्या असलेल्या रेल्वेत बसलो. या गाडीने शेवटचा थांबा असलेल्या कानपूरला उतरलो. तेथे स्टेशनवर दुकानदारांकडून पाण्याच्या बाटल्या घेऊन विक्रीचे काम सुरू केले. आम्हाला ७० ते ८० रुपये मिळायचे. एके दिवशी पाण्याच्या बाटल्या विकण्यासाठी गाडीत चढलो. मात्र, धावत्या गाडीतून उतरता न आल्याने थेट गोरखपूरला पोहोचलो. त्यामुळे आमची ताटातूट झाली. त्यामुळे भाऊ गणपत कानपूर पाेलिसांच्या मदतीने दाेन महिने अाधीच घरी परतला. मला  गोरखपूर रेल्वेस्थानकावर फिरताना तेथील पोलिसांनी पाहिले. अधिक चाैकशी करून बालसुधारगृहात पाठवले व पाेलिसांच्या मदतीने अाता  मी माझ्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पाेहाेचलाे.’

 

अामची मेहनत सफल  
बेपत्ता नीलेश गोरखपूरमध्ये असल्याचे समजताच त्याच्या वडिलांना घेऊन स्थानिक पोलिस पथक तिकडे रवाना झाले होते. मंगळवारी सायंकाळी एएसआय माणिक निकम, हवालदार कांतीलाल केदारे हे नीलेशला घेऊन मुक्ताईनगर पाेलिस ठाण्यात पोहोचले. येथे नीलेशसह त्याचा आई-वडिलांचे जाबजवाब घेण्यात आले. ‘या भावंडांना पुन्हा त्यांचे आई-वडील मिळाले. यामुळे आमची मेहनत सफल झाली,’ अशी भावना पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...