आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान भरपाईसाठी जलसंपदामंत्र्यांच्या कार्यालयासमाेर फेकली केळी; देवकरांची पाेलिसांसाेबत शाब्दिक चकमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्ह्यातील केळी उत्पादकांना गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई हेक्टरी १ लाख रुपये मिळावी, विशेष पॅकेज मंजूर करावे, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी किसान सभेतर्फे मंगळवारी दुपारी १.३० वाजता जळगावातील शिवतीर्थ मैदानासमाेरील रस्त्यावर केळी फेकाे अांदाेलन करण्यात अाले. भररस्त्यावर केळी भरलेले ट्रॅक्टर रिकामे करून त्यातील घड व केळी जलसंपदामंत्री गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालयाच्या दिशेने भिरकावली. ती अडवताना पाेलिसांच्या नाकीनऊ अाले. पाेलिस बंदाेबस्त भेदून अांदाेलकांनी मंत्री महाजनांच्या कार्यालयावर केळी फेकून अांदाेलन यशस्वी केले. 


राष्ट्रवादी किसान सभेतर्फे दुपारी १.३० वाजता शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृषक भवनासमोरील रस्त्यावर शासनाविरोधात रोष व्यक्त करून िकसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकर धोंडगे यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले. 


पाेलिसांना गुंगारा; फेकली केळी 
अटकाव केल्यानंतरही प्रतिभा शिरसाठ, शोभा पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गराड्यातून धावत जावून केळीचे घड मंत्री महाजनांच्या संपर्क कार्यालयात फेकले. अटकाव करणाऱ्या पोलिसांबरोबर रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधाकांनाही ही फेकलेली केळी लागली. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. काेणत्याही क्षणी लाठीहल्ला होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना लोटत-लोटत कोर्ट चौकात आणले. त्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर फेकलेली केळी पोलिसांनी उचलून शिवतीर्थ मैदानावर टाकली. 


पाेलिस-अांदाेलकांत शाब्दिक चकमक अन‌् धक्काबुक्की, जिल्हाध्यक्ष साेपान पाटील काेसळल्याने पायाला खरचटले अाठवडाभरात मदत मिळाली नाही तर महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमावर्ती भागातही तीव्र अांदाेलन करण्याचा दिला इशारा.

 
रेटारेटी अन‌् शाब्दिक चकमक 
किसान सभेचे जिल्हाध्यक्ष साेपान पाटील यांच्यासह अांदाेलक व पाेलिसांत शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. यात पाटील हे खाली काेसळल्याने त्यांच्या हाताला व पायाला खरचटले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना लोटत-लोटत कोर्ट चौकात आणले. पोलिसांनी वाहनाची चावी घेतल्यामुळे आंदोलकांनी पुन्हा कृषक समाजाच्या कार्यालयासमोर िठय्या मांडला. केळीचे घड फेकण्यासाठी निघालेले आंदोलक व पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक व रेटारेटी झाली. जिल्हापेठचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी संतप्त होत आंदोलकांना कारवाईचा इशारा दिला. 


सरकारने केळी उत्पादकांच्या ताेंडाला पाने पुसल्याने संताप 
वादळाने नुकसान झालेल्या केळी उत्पादकांच्या शेतांची मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी स्वत: पाहणी करून हेक्टरी एक लाख रुपयांची मदत व पॅकेज जाहीर केले अाहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आठवडाभरात मदत न दिल्यास सीमावर्ती भागात मोठे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकर धोंडगे यांनी दिला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन दिले होेते. त्यानुसार अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी किसान सभेतर्फे केळी फेको आंदोलन करण्यात अाले, अशी माहिती या वेळी देण्यात अाली. 


अंगाला हात लावायचा नाही, डीवायएसपी सांगळेंनी भरला दम 
केळी फेक आंदोलनादरम्यान पोलिसांच्या अंगावर केळी फेकल्याचे कळल्यानंतर संतप्त झालेले पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे हे कृषक भवनासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी पाेहचले. आंदोलकांना उठवून लोटत ते मध्यभागी शिरले. त्यानंतर सोपान पाटील यांना अंगाला धक्का लावायचा नाही, असे बजावले. 'अंगाला धक्का लावू नको, अधिकारी म्हणून धक्का लावायचा नाही. भरपूर संयम बाळगतोय', अशा शब्दात त्यांनी पाटील यांना सुनावले. तर 'नाही लावला धक्का', असे पाटील म्हणाले. त्यानंतर त्यांच्या अंगाला हात लावणाऱ्या सोपान पाटील यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनाही त्यांनी ढकलले. त्यानंतर देवकर ढकलू नका, असेही म्हणाले. यादरम्यान सांगळे यांनी आंदोलकांना कारवाई करण्याचाही इशारा दिला. त्यानंतर अांदाेलकांनी घाेषणाबाजी केली. 

बातम्या आणखी आहेत...