आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात पिकास पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील सावखेडासिम शिवारात एका ५५ वर्षीय शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. नागो भावराव पाटील असे शेतकऱ्याचे नाव असून ते नायगाव येथील रहिवाशी आहेत. तालुक्यात अस्वलाने हल्ला केल्याची ही आठवडा भरातील तीसरी घटना आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास नागो भावराव पाटील वय ५५ वर्ष रा. नायगाव हे आपल्या सावखेडासिम शिवारातील शेतात पिकास पाणी भरण्यास गेले होते. दरम्यान रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला त्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली, तसेच अस्वलाने त्यांच्या डाव्या कानाचे लचकेच तोडले आहे. जखमी अवस्थेत त्यांना किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यानंतर प्रथमोपचार करूत जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...