आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात युती फिस्कटली; भाजप- सेना आमने-सामने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महिनाभरापासून सुरू असलेल्या भाजप- शिवसेना युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ अखेर बुधवारी थांबले. भाजप व शिवसेनेची युती अखेर फिस्कटली असून दाेन्ही पक्षांनी प्रत्येकी ७५ उमेदवार रिंगणात उतरवले अाहेत. दाेन्ही मित्र पक्ष अामने-सामने लढण्यावर शिक्कामाेर्तब झाले अाहे. जळगाव महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ अाॅगस्ट राेजी हाेत अाहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस हाेता. 


जळगावातील १९ प्रभागातील ७५ जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत ६१५ अर्ज दाखल झाले अाहेत. गुरुवार, दि. १२ जुलै राेजी दाखल अर्जांची छाननी हाेणार असून वैध उमेदवारी अर्जांची यादी जाहीर केली जाणार अाहे. उमेदवारी दाखल केलेल्या अर्जांमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी व काॅग्रेस या राजकीय पक्षांनी अापापले उमेदवार रिंगणात उतरवले अाहेत. 


तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला हो अथवा नाही असे स्पष्ट उत्तर भाजपतर्फे कळविण्यात अाले नाही. युतीला पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा हिरवा कंदिल असताना स्थानिक पातळीवरील नेत्यांनी युतीसंदर्भात कुठलेही पाऊल टाकले नसल्याचे उमेदवारी अर्जाच्या संख्येवर स्पष्ट झाले अाहे. 

 

दोघांचे ७५ उमेदवार
भाजप व शिवसेना सर्व ७५ जागांवर लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने ५२ तर काँग्रेसने १७ उमेदवार रिंगणात उतरवले अाहेत. सपा ६ आणि ३९० अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...