आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरमध्ये सव्वादोन लाखांचे बोगस कापूस बियाणे जप्त, 4 जणांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- पाेलिसांसह कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने सव्वादाेन लाखांचे कापसाचे बाेगस बियाणे रविवारी अमळनेरात पकडले. या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. अारसीएच ६५९ नावाचे हे बियाणे हाेते. 


कापसाचे बाेगस बियाणे विक्रीसाठी येत असल्याची माहिती पाेलिस व कृषी विभागाला रविवारी मिळाली. त्यानुसार पाेलिस   व कृषी विभागाच्या पथकाने सिंधी काॅलनीजवळ चारचाकीची (एम.एच. १९ सी.एफ. ४२६७) तपासणी केली असता. त्यात २ लाख २४ हजार २२० रुपये किमतीच्या बाेगस बियाण्याच्या ३०० पिशव्या जप्त करण्यात अाल्या. दिनेश शंकर महाजन, किशोर शामराव महाजन,संदीप मधुकर साळी (तिघे रा.अमळनेर) व नितीन रमेश चव्हाण (रा. पिंपळी, ता.अमळनेर) या चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अाला. भादंवि कलम ४२०, ४६३, ४६५, ४६८, ४७१,(३४) सह महाराष्ट्र बियाणे, उत्पन्न, उत्पादक विक्रेत्याचे नाव गुणवत्तेचे उल्लंघन, तसेच विनापरवाना कापूस बियाणे साठवणूक, पॅकिंग विक्री अधिनियम १९६६ चे खंड ७ चे व महाराष्ट्र कापूस बियाणे पुरवठा व वितरण विक्री निश्चिती अधिनियम २००९/१० चे कलम १० चे उल्लघन, तसेच जीईएसी मान्यतेचा उल्लेख नसल्याने पर्यावरण संरक्षण कायदा १९६८ चे उल्लंघन अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा १९५५ चे कलम ३,९ चे उल्लंघन ७ अशी कलमे या गुन्ह्यात लावण्यात अाली. डीवायएसपी रफीक शेख, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, काॅन्स्टेबल विजय साळुंखे, रवींद्र पाटील, योगेश महाजन, बापू पारधी, संतोष पाटील व कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी मधुकर चौधरी, मोहीम प्रमुख पी. एम. महाजन, कृषी विस्तार अधिकारी अमोल भदाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


दाेघांमध्ये फरक असा 
खऱ्या बियाणात कंपनीचे नाव सरळ आहे तर जप्त केलेल्या कंपनीच्या पिशवीवर हे नाव खाली-वर आहे. पिशवीच्या मागील बाजूला वापरण्याच्या सूचना मराठीत न ठेवता ते बोगस बियाणाच्या पिशवीवर इंग्रजीत छापले आहे. मागील बाजूस नॉन बीटी असा एक कॉलम असून ते मूळ कंपनीच्या पिशवीवर आढळून आलेले नाही. वरच्या रॅपरवर मूळ पिशवीवर काळा चौकोन ठळक आहे. तर बोगस पिशवीवर काळा चौकोन आयातासारखा बारीक आहे. लोगोच्या रंगातही बराच फरक आहे. 


असा अाेळखा फरक 
'रासी जेन चेक' या अॅपवरून असली-नकली माहिती ओळखता येते. तसेच बियाणांच्या पिशवीवर बारकोड स्क्रश करावा लागताे. त्याखाली नंबर असतो. ताे पाॅकिटावर दिलेल्या क्रमांकावर एसएमएस केल्यास कंपनीकडून बियाणे खरे की खाेटे यासंदर्भात मेसेज येताे. 

 

पुढील स्लाइडवर पाहा दोन्ही पॅकेटमधील फरक....

बातम्या आणखी आहेत...