आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस उत्पादकांना हादरा; महिन्यात बाेंडअळीचा हल्ला! शासकीय यंत्रणा लागली नियंत्रणाच्या कामाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या वर्षी बीटी कापसावरील बाेंडअळीचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी पुरेशी काळजी घेवून देखील यंदा जुलै महिन्यातच बाेंडअळीचा प्रादुर्भाव झाला अाहे. याबाबत कृषी विभागाने तातडीने बाेंडअळी नियंत्रणाची मोहीम हाती घेतली अाहे. 


या संदर्भात जिल्हा परिषदेत कृषी सभापती नंदकिशाेर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती. कृषी उपसंचालक अनिल भाेकरे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी कापसावर बाेंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याची खात्री करण्यासाठी शेतात फेराेमेन सापळे लावावेत, काड्यांची अॅन्टेना लावावी. फेराेमेन सापळ्यात नर पतंगाची संख्या जास्त असल्यास शेतामध्ये फवारणी करण्याचा सल्ला या वेळी देण्यात अाला. 


सापळ्यामध्ये सापडलेल्या नर पतंगांना नष्ट करून त्यानंतर कपाशीवर निंबाेळी अर्क तसेच कृषी विभागाने सुचवलेल्या अाैषधांची फवारणी केली पाहिजे. शेतात अँटेना (पक्षी थांबे)बसवल्यास त्यावर पक्षी बसून कापसाच्या झाडावरील अळ्या टिपून घेत असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात अाले. कापसाच्या पिकात चवळी अाणि मका ही सापळा पीके घेण्याची शिफारस कृषी विभागाने केली अाहे. कृषी समिती सभापती तथा उपाध्यक्ष नंदकिशाेर महाजन यांनी शेतकऱ्यांनी शेतात फेराेमेन सापळे लावण्याचे अावाहन केले.

बातम्या आणखी आहेत...