आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेततळ्यात पाय घसरून मुलाचा मृत्यू, अमळनेरमधील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव (अमळनेर) - शेतातून परतत असताना शेततळ्यात पाय घसरून 10 वीच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे अकराच्या सुमारास तालुक्यातील वावडे येथे घडली. प्रवीण सुरेश भिल असे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या मुलाचे नाव आहे.

 

सुरेश आज सकाळी वडिलांसोबत शेतात कपाशी लावण्यासाठी गेला होता. यादरम्‍यान परिसरात पाऊस आल्याने बाप लेक परत येत होते. मुडी वावडे रस्त्यानजीक असलेल्या एका शेततळ्यात सुरेशचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. यावेळी वडीलांनी त्‍याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्‍यांचे प्रयत्‍न निरर्थक ठरले. मुलगा बुडाल्‍याची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती वजाबाई भिल यांनी त्‍यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.  मात्र तोपर्यंत त्‍याची प्राणज्‍योत मालवली होती. याप्रकरणी मारवड पोलिस स्‍टेशनमध्‍ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...