आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममध्ये पिनकाेड पाहून लांबविले वीस हजार, मुख्याध्यापकाची फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच एटीएम सेंटरमध्ये घडली घटना. - Divya Marathi
याच एटीएम सेंटरमध्ये घडली घटना.

धुळे- खात्यात किती रक्कम अाहे, हे एटीएममध्ये तपासत असताना तिथे असलेल्या एकाने पिनकाेड नंबर टाका असे सांगितले. त्याच व्यक्तीने पिनकाेड नंबर लक्षात ठेवून नंतर एटीएममधून वीस हजार रुपये काढून मुख्याध्यापकाची फसवणूक केली. शहरातील स्टेट बंॅकेच्या काेषागार शाखेजवळ असलेल्या एटीएम केंद्रात हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध पाेलिसांत गुन्हा दाखल झाला अाहे.

 

वलवाडी शिवारातील वडेल राेड येथील अार्य नगरात राहणारे युवराज बाजीराव पाटील हे शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथील विद्यालयात मुख्याध्यापक अाहेत. त्यांच्या वेतनासाठी नरडाणा येथील स्टेट बँकेत खाते अाहे. त्यांनी घरबांधणीसाठी एचडीएफसी बंॅकेतून कर्ज घेतले. त्यांच्या बचत खात्यातून दरमहा कर्जाच्या हप्त्यापाेटी रक्कम कपात हाेते. त्यासाठी ते २६ नाेव्हेंबर राेजी सायंकाळी साडेपाच वाजता काेषागार शाखेजवळ असलेल्या एटीएममध्ये खात्यात किती रक्कम अाहे, हे पाहण्यासाठी गेले. तेव्हा एटीएम सेंटरमध्ये एक व्यक्ती उभी हाेती. त्याच्याकडे पाटील यांनी पैसे अाहेत का अशी विचारणा केली.


नंतर त्यांनी खात्यात किती रक्कम अाहे हे तपासत असताना संबंधित व्यक्तीने त्यांना पिनकाेड नंबर टाकण्याचा सल्ला दिला. त्यांनी खात्यातील शिल्लक रकमेची माहिती घेतली. त्या वेळी त्यांच्या खात्यात २२ हजार ५५५ रुपये हाेते. त्यांना खात्यात कमी असलेली पंधराशे रुपयांची रक्कम भरावयाची असल्याने ते प्रमाेद नगरातील स्टेट बंॅकेत गेले. तेथे पंधराशे रुपये भरल्यानंतर त्यांच्या खात्यात केवळ चार हजार ५५ रुपये असल्याची माहिती त्यांना मिळाली. तेव्हा त्यांनी माेबाइल चेक केला असता खात्यातून २० हजार रुपये काढल्याचा मेसेज अाला हाेता. त्यामुळे एटीएम केंद्रात असलेल्या पिनकाेड नंबर टाकण्याचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीने त्याचा गैरवापर करीत खात्यातून वीस हजार रुपयांची रक्कम काढल्याचा संशय अाहे. याबाबत युवराज पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पाेलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास हेडकाॅन्स्टेबल एम.एस. बडगुजर करीत अाहेत.

 

बातम्या आणखी आहेत...