आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारची धडक; महिला उडाली 8 फूट उंच, जळगावमधील थरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बहिणाबाई चौकात गुरुवारी रात्री ८.४५ वाजता वृद्धाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने सुरुवातीला दुभाजकाला व त्यानंतर तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेली महिला अाठ फूट उंच हवेत फेकली जाऊन थेट कारच्या बोनेटवर जावून आदळली. बाेनेटवरून खाली जमिनीवर कोसळताच त्यांच्या अंगावरून कारचे चाक गेले. तर दुचाकीस्वाराला ३० फूट फरफटत नेले. यानंतर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आणखी दोन दुचाकींना धडक दिली. दरम्यान, जिल्हापेठ पाेलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले अाहे.

 

गायत्रीनगरातील रहिवासी अशोक जवाहरलाल कुकरेजा (वय ५१) व त्यांच्या पत्नी माया कुकरेचा (वय ५०) हे दोघे दुचाकीने (क्रमांक एमएच-१०, एएम, ०३३४) बहिणाबाई उद्यानासमोरुन टागेारनगरच्या दिशेने पुढे जात होते. त्यांच्या दुचाकीच्या मागून मुरारीलाल मोहनलाल अबोटी (वय ६१, रा.गायत्रीनगर) हे वृद्ध भरधाव कार (क्रमांक एमएच-१९, एई, ५०९४) घेऊन आले. अबोटी यांचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे सुरुवातीला त्यांची कार सुमारे २० फूट अंतरापर्यंत दुभाजकाला घासत आली. या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या उडत होत्या. हे पाहून उद्यानाबाहेरील नागरिक भयभीत झाले हाेते.


काही कळण्याच्या अाात अबोटींच्या कारने चौकात कुकरेजा दाम्पत्याच्या दुचाकीस जाेरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या माया कुकरेजा ह्या ८ फूट उंच हवेत फेकल्या जाऊन थेट कारच्या बोनेटवर जावून आदळल्या. बाेनेटवरून खाली कोसळल्यानंतर त्यांच्या अंगावरून चारचाकीचे एक चाक गेले. तर दुचाकी चालवणारे त्यांचे पती अशोक कुकरेजा यांच्या हातून दुचाकी सुटून ती थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन कोसळली. या वेळी कुकरेजा हे कारच्या बंपरमध्ये अडकून ३० फूट फरफटत गेले. यानंतरही अबेाटी यांना चारचाकी थांबवता न आल्याने ते थेट रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या हॉटेल रुद्रच्या बाहेर पार्किंगमध्ये उभ्या दोन दुचाकींना (क्रमांक एमएच-१९, डीबी, ९३८५ व एमएच १९ एक्यु ५६४०) धडकली. याानंतर पुढे जाण्यास जागाच न राहिल्यामुळे कार उभी राहिली. या वेळी उभ्या कारच्या खाली अशोक कुकरेजा अडकून पडले होेते. सुमारे १५ मिनिटे प्रयत्न केल्यानंतर नागरिकांनी एकत्र येत कार उचलून त्यांना बाहेर काढले. प्रचंड वेदनांनी विव्हळत असलेल्या कुकरेजा व त्यांच्या पत्नीस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशेाक कुकरेजा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

अबोटी पोलिसांच्या ताब्यात
अपघातानंतर कार उभी राहिली तरी अबोटी त्यातून बाहेर पडत नव्हते. अपघातामुळे त्यांनादेखील जबर धक्का बसला होता. अखेर जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. संतप्त नागरिकांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी अबोटी यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. अबोटी हे देखील गायत्रीनगरातील रहिवासी आहेत. आपण श्री स्वामी समर्थ केंद्रात दर्शनासाठी जात होतो, काय घडले याबाबत अापणास काहीच सांगता येत नाही, असे त्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

 

सुदैवाने दाेघे भाऊ बचावले
पार्किंगमध्ये उभ्या दोन दुचाकींना कारने धडक दिली. या वेळी सुदैवाने दुचाकीचालक नीलेश शिपलकर हे शेजारीच मेडिकलवर औषधी खरेदी करण्यासाठी गेले होते. तर त्यांचे भाऊ अजय शिपलकर हे दुचाकीपासून काही अंतर दूर उभे होते. त्यामुळे दोघे भाऊ या अपघातात बचावले; परंतु, ही आपबीती कथन करताना शिपलकर बंधूंसह चौकातील नागरिकांच्या अंगावर शहारे उभे राहिले होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...