आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरत- नागपूर महामार्गावर कार आणि टेम्पोची धडक, चार जण गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- नंदुरबार जिल्ह्यातील नागपूर -सुरत महामार्गावर नवापूर तालुक्यातील सावरट गावाजवळ कार आणि टेम्पोची  सोमवारी दुपारी समोरा समोर धडक झाली. या अपघातात कारमधील चार प्रवाशी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नवापूरमधील हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 

अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनस्थळी पोहचले असून जखमींवर जखमींवर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात जखमी झालेल्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...