आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळ्यात लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून दोन Group भिडले, 29 जणांवर दंगलीचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा- शहरातील कुरेशी माेहल्ला भागात लहान मुलांत खेळण्यावरून वाद झाला. त्यातून माेठ्यांच्या दाेन गटांत तुंबळ हाणामारी झाली. शनिवारी (दि.२१) रात्री ही घटना घडली. परस्परविराेधी तक्रारींवरून २९ जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी १४ अाराेपींना अटक करण्यात अाली. त्यांना मंगळवारी पाराेळा न्यायालयात हजर करण्यात अाले असता दाेन दिवसांची पाेलिस काेठडी मिळाली.  

 

 पाराेळ्यातील कुरेशी मोहल्ल्यात लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून माेठ्यांचे दाेन गट भिडले. तुंबळ हाणामारीत अनिदाबी रज्जाक खान कुरेशी, शाखीर खान रज्जाक खान कुरेशी व रज्जाक खान उस्मान खान कुरेशी हे तिघे जखमी झाले. आसिफ खान रज्जाक खान कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून २९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. 
  

बातम्या आणखी आहेत...