आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्‍ये अल्‍पवयीन मुलीचे अपहरण, 5 जणांविरूद्ध गुन्‍हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल पोलिस स्‍टेशनमध्‍ये फिर्याद घेताना पोलिस. - Divya Marathi
यावल पोलिस स्‍टेशनमध्‍ये फिर्याद घेताना पोलिस.

यावल - शहरातील विरार नगर येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्‍याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 जूनच्या मध्यरात्रीपासून अल्पवयीन बेपत्ता झाली होती. मुलीचा सर्वत्र शोध घेऊनही तिचा पत्‍ता न लागल्‍याने तसेच महिन्याभरापूर्वी ज्या तरुणाने या मुलीशी प्रेम असल्याचे कारण पुढे करून मुलीच्या कुटुंबीयांशी वाद घातला होता, तो मुलगा देखील शहरातून बेपत्ता असल्याने त्‍या मुलानेच मुलीला फुस लावून पळवून नेल्‍याचा संशय कुटुंबियांनी व्‍यक्‍त केला आहे.


संशयिताने मुलीला पळवून नेण्‍याची दिली होती धमकी 
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १६ जून रोजी ते आपल्या कुटुंबासह रात्री घरात झोपले होते. मध्यरात्रीनंतर ते पाणी पिण्यासाठी जागे झाले असताना त्यांची 17 वर्षीय मुलगी घरात आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र मुलगी कुठेही सापडली नाही. महिन्याभरापूर्वीच शहरातीलच रहिवासी आरिफ भटू पटेल या तरुणाने अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे कारण पुढे करत त्यांच्याशी वादही घातला होता. त्यावेळी आरिफ पटेलची आत्या कमा नजीर पटेल (रा. पिप्री तालुका धरणगाव) यांनी व त्‍याच्‍या कुटुंबीयांनी या तरुणाला समज दिली होती. त्याचवेळी या तरुणाने आपण तुमच्या मुलीला पळवून घेऊन जाऊ असा दम दिला होता. 

 

यामुळे बळावला संशय 
16 तारखेला मुलगी बेपत्‍ता झाली तेव्हा तो तरूण देखील गावातुन गायब झाल्याचे मुलीच्‍या वडीलांच्‍या निर्दशनास आले. 20 जुन पर्यंत या अल्पवयीन मुलीचा त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ती न सापडल्‍याने वडीलांची पूर्ण खात्री झाली की आपल्या मुलीस काहीतरी फुस लावून त्याच तरूणाने पळून नेले. त्‍यामुळे बुधवारी यावल पोलिसात मुख्य संशयित आरिफ भटू पटेल, मरियम दौलत पटेल, हमीद दौलत पटेल, शकील दौलत पटेल (सर्व राहणारे, यावल) व कमा नजीर पटेल (रा. पिंप्री ता. धरणगाव) या पाच जणांविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, संशयति तरूणाचे फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...